कोरोनाविरु द्धच्या लढाईत खेडेगावांचा पुढाकार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2020 09:25 PM2020-07-08T21:25:34+5:302020-07-09T00:34:10+5:30

पेठ : कोविड-१९चा शिरकाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील खेडेगावांनी पुढाकार घेतला असून, ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधात्मक साहित्यासह खबरदारीचा उपाय म्हणून ‘डोअर टू डोअर’ नागरिकांची थर्मल तपासणी केली जात आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह ग्रामीण भागात कोरोनाने केलेला शिरकाव वाडीवस्तीवरील जनतेच्या मनात धडकी भरवणारा आहे.

Villages take the lead in the battle of Koronaviru! | कोरोनाविरु द्धच्या लढाईत खेडेगावांचा पुढाकार !

कोरोनाविरु द्धच्या लढाईत खेडेगावांचा पुढाकार !

Next

पेठ : कोविड-१९चा शिरकाव रोखण्यासाठी ग्रामीण भागातील खेडेगावांनी पुढाकार घेतला
असून, ग्रामपंचायत स्तरावर प्रतिबंधात्मक साहित्यासह खबरदारीचा उपाय म्हणून ‘डोअर टू डोअर’ नागरिकांची थर्मल तपासणी केली जात आहे.
मुंबई, पुणे, नाशिकसह ग्रामीण भागात कोरोनाने केलेला शिरकाव वाडीवस्तीवरील जनतेच्या मनात धडकी भरवणारा आहे. फारशा आरोग्याच्या सुविधा नसलेल्या नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी स्थानिक प्रशासन व ग्रामस्थ यांनी आशासेविका, अंगणवाडीसेविका, ग्रामपंचायत व नगरपंचायत कर्मचारी यांच्या मदतीने प्रत्येक घरातील नागरिकांची तपासणी केली जात आहे.
थर्मल गण (तापमापन यंत्र), पल्स आॅक्सिमीटर, अ‍ॅटोमॅटिक हॅण्ड सॅनिटायजर, हॅण्डवॉशचे वाटप करण्यात आले आहे.
बोरवठ येथील ग्रामपंचायत सॅनिटायझर डिस्पेंन्सर मशीन बसविण्यात आले आहे. यासाठी गावातील नागरिक, बचतगटाच्या सर्व महिला मंडळ यांचा सहभाग घेतला आहे. पेठ शहरात कोरोनाच्या शिरकावामुळे परिसरातील खेड्यातील जनता सतर्क झाली आहे. आरोग्य, महसूल, पोलीस प्रशासनाकडून शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करण्याबाबत यंत्रणेद्वारे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Villages take the lead in the battle of Koronaviru!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक