त्र्यंबक तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 09:35 PM2020-12-24T21:35:55+5:302020-12-25T00:57:55+5:30

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांनी सांगितले.

Villages in Trimbak taluka face water shortage | त्र्यंबक तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा

त्र्यंबक तालुक्यातील गावांना पाणीटंचाईच्या झळा

Next
ठळक मुद्देगावांना ऐन टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात येईल.

त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील मुलवड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील वाड्या-पाड्यांना पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या गावांना तत्काळ पाणी उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे. दरम्यान, ६८५ कुटुंबांना जलजीवन मिशनच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येणार असून त्यासाठी पाठपुरावा सुरु असल्याचे ग्रामविकास अधिकारी संजय आहेर यांनी सांगितले.

मुलवड ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील वळण सावरीचा माळ, उंबरघोडा, घोटबारी, काकडवळण आदी गावांमध्ये डिसेंबर महिन्यातच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. या गावातील पाणीटंचाई त्वरित दूर करण्यासाठी ग्रामविकास अधिकारी आहेर यांना सिताराम चौधरी व त्यांच्या सहका-यांनी साकडे घातले आहे. तथापि, मुळवडचे ग्रामपंचायत सदस्य रघुनाथ घाटाळ यांनी या गावांना पाणीटंचाई असल्याची कबूली देताना सांगितले, की अजून पाण्याचे स्त्रोत सहसा आटले नसले तरी ऐन रणरणत्या उन्हाळ्यात पाण्याचे स्त्रोत झपाट्याने कमी होत गेले तर त्यावेळी काय करायचे असा प्रश्न उपस्थित केला. त्यापेक्षा सध्या या राखीव असलेल्या विहीरीवरुन पंपिंगद्वारे वळण चौरापाडा, काकडवळण, घोटबारी, उंबरघोडा आदी गावांना ऐन टंचाई काळात पाणीपुरवठा करण्यात येईल. त्यामुळे तालुक्यात इतरत्र पाणीटंचाई भासत असल्यास दीड-दोन किलोमीटर परिसरातून पाणी आणून ती समस्या सोडविता येते, असेही परस्परविरोधी सूर ऐकावयास मिळत आहेत.

प्रत्येक गावात पाण्याचे स्त्रोत आहेत, परंतु वास्तवात टंचाई परिस्थिती नाही. मात्र मार्च, एप्रिल, मे व जूनमध्ये टंचाई भासेल तेव्हा मुलवड वळण रस्त्यावरील विहीरीवर १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून पाईपलाईन टाकून मोटारद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आम्ही ठरविले आहे. आताच या विहीरीचा उपसा केला तर खरोखरच्या टंचाई काळात पाणी कुठून आणायचे?
- संजय आहेर, ग्रामविकास अधिकारी

Web Title: Villages in Trimbak taluka face water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.