गावातील तंटे गावातच मिटावेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:44 AM2017-08-26T00:44:39+5:302017-08-26T00:44:45+5:30
गाव पातळीवरील विविध खटले व तंटे मिटविण्यात पोलीसपाटील हा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने न्यायालये व पोलीसपाटील यांनी ठरविल्यास लाखो प्रलंबित खटले लोकन्यायालयात निकाली निघून गावागावातील वाद कायमचे मिटून सामाजिक एकोबा निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन इगतपुरी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. ढेकळे यांनी केले.
घोटी : गाव पातळीवरील विविध खटले व तंटे मिटविण्यात पोलीसपाटील हा महत्त्वाची भूमिका बजावत असल्याने न्यायालये व पोलीसपाटील यांनी ठरविल्यास लाखो प्रलंबित खटले लोकन्यायालयात निकाली निघून गावागावातील वाद कायमचे मिटून सामाजिक एकोबा निर्माण होऊ शकतो, असे प्रतिपादन इगतपुरी न्यायालयाचे न्यायमूर्ती एस.के. ढेकळे यांनी केले. इगतपुरी विधी सेवा समिती व वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील पोलीसपाटलांची इगतपुरी येथे बैठक घेण्यात आली. यावेळी न्यायमूर्ती ढेकळे बोलत होते. सर्वसामान्य नागरिक व प्रशासन यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीसपाटील काम करत आहेत.
पोलीसपाटलांना खटले मिटविण्यात वकील संघाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल, असे मत वकील संघाचे अध्यक्ष रतनकुमार इचम यांनी सांगितले. तालुक्यातील अनेक पोलीसपाटलांनी आपल्या समस्या न्यायमूर्तींसमोर मांडल्या. यावेळी न्यायमूर्ती एल. के. सपकाळ, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. रतनकुमार इचम, उपाध्यक्ष अकबर शेख, पोलीसपाटील संघटनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र खातळे, सचिव कैलास फोकणे, उपाध्यक्ष मनीषा बºहे, शैला नाठे, भाऊसाहेब शेलार, कचरू वाकचौरे, ज्ञानेश्वर धोंगडे, सोमनाथ बेझेकर,
अनिल जाधव, प्रकाश नवले, भिवाजी चुंभळे, विलास चौधरी, सुरेश कोकणे, संपत खातळे, संपत धात्रक, ललिता शिंदे, मधुकर धांडे, सविता घाडगे, सीमा भोर, लखन भोर, सदाशिव भोसले, प्रकाश रोंगटे, ज्ञानेश्वर रहाडे, विष्णू वारुंगसे, रामकृष्ण भगत, नामदेव पदमेरे, सुभाष कोरडे, अनिता गोसावी, रूपाली शिरसाठ आदिंसह तालुक्यातील सर्व पोलीसपाटील उपस्थित होते़
प्रलंबित खटल्याची यादी देणार
गावातील बारीक सारिक वादतीत घटनेबद्दल माहिती असलेला एकमेव व्यक्ती म्हणजे पोलीसपाटील आहे. त्यामुळे या घटकाने ठरविल्यास न्यायालयाचे सहकार्य व लोकन्यायालयाच्या माध्यमातून अनेक प्रकारचे वाद कायमचे मिटवू शकतात याबाबतीत न्यायालय सर्वतोपरी सहकार्य करील व गावातील प्रलंबित खटल्यांची एक यादी देण्यात येईल, असे न्यायमूर्ती एस.के. ढेकळे यांनी सांगितले.