इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी विमल गाढवे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2020 03:02 PM2020-10-26T15:02:27+5:302020-10-26T15:02:27+5:30
घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या विमलबाई नामदेव गाढवे यांची निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली.
घोटी : इगतपुरी पंचायत समितीच्या उपसभापतीपदी शिवसेनेच्या विमलबाई नामदेव गाढवे यांची निवड करण्यात आली. मावळत्या उपसभापती जिजाबाई नाठे यांनी आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसभापती पदासाठी ही निवड करण्यात आली.
इगतपुरी पंचायत समीतीचे सभापती पद हे आदिवासी प्रवर्गासाठी राखीव असल्याने उपसभापती पदाला विशेष महत्व आहे. त्यामुळे जिजाबाई नाठे यांनीही आवर्तन पद्धतीने राजीनामा दिल्याने उपसभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्कंठा होती. त्यासाठी शिवसेनेच्याच सौ विमलबाई गाढवे यांच्या नावाची प्रारंभीपासूनच चर्चा होती. त्याच चर्चेवर शिक्कामोर्तब झाले.
तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या अध्यक्षतेखाली व सभापती जया कचरे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने गाढवे यांची निवड जाहीर करण्यात आली. निवडणुकीस सहायक म्हणून गटविकास अधिकारी डॉ लता गायकवाड सहायक बीडीओ भरत यंदे, आदीनी काम पाहिले. या निवडीप्रसंगी माजी आमदार शिवराम झोले, जनार्धन माळी, निवृत्ती जाधव, हरिदास लोहकरे , सुनिल वाजे, संपत काळे, कचरू डुकरे, पांडुरंग ब-हे, नंदलाल गाढवे, नामदेव गाढवे मोहन ब-हे, राजू नाठे, रघुनाथ तोकडे, मधुकर कोकणे, हरिभाऊ वाजे, पांडुरंग गाढवे, पांडुरंग शिंदे, बाळासाहेब सुराणा, देविदास जाधव, केरू पा देवकर उपस्थित होते.
एकाच गटाचा योगायोग
इगतपुरी तालुक्यात टाकेद - खेड गट हा नेहमीच प्राबल्यवाण ठरत असतो. निवडणुकीतही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत या गटाने एकहाती विजय मिळविला होता. विशेष म्हणजे याच गटातील सौ जया कचरे या सभापती आहे तर सौ विमल गाढवे यांच्या रूपाने उपसभापतीपदही त्याच गटाकडे गेल्याने तालुक्याची धुरा व विकासाचा गाडा आता खेड गटाकडे असणार हे स्पष्ट झाले आहे त्यामुळे हा योगायोग आहे. सिंधुबाई वाजे यांच्यानंतर दहा वर्षाने विमलबाई गाढवे यांना उपसभापतीपद पूर्व भागाकडे गेले.
(२६ घोटी १)