अग्निपंख फाऊंडेशनच्या सिन्नर समन्वयकपदी विनायक काकुळते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 08:27 PM2020-09-29T20:27:18+5:302020-09-30T01:04:30+5:30
सिन्नर:राज्यातील अग्निपंख फाऊंडेशन विज्ञान (एन जी.ओ) या उपक्रमशील शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी काम करणार्या संस्थेचे राज्यस्तरिय निवडपत्र वाटपाचा दिमाखदार सन्मान सोहळा नुकताच ऑनलाइन संपन्न झाला. यात सिन्नर तालुका समन्वयकपदी एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभागाचे उपक्रमशील शिक्षक विनायक काकुळते यांची निवड करण्यात आली.
सिन्नर:राज्यातील अग्निपंख फाऊंडेशन विज्ञान (एन जी.ओ) या संस्थेचे राज्यस्तरिय निवडपत्र वाटपाचा सन्मान सोहळा नुकताच ऑनलाइन संपन्न झाला. यात सिन्नर तालुका समन्वयकपदी एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभागाचे शिक्षक विनायक काकुळते यांची निवड करण्यात आली.
महाराष्ट्रातील सर्व विभागातील समन्वयक, जिल्हासमन्वयक व तालुका समन्वयकांची निवड व निवडपत्र वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अग्निपंख फाऊंडेशन निवड समितीचे अध्यक्ष ओंकार चेके होते. प्रमुख पाहुणे म्हणुन राज्यसमन्वयक गजानन गोपेवाड व महिला राज्यसमन्वयक जयश्री शिरसाटे उपस्थित होत्या. नाशिक विभागीय समन्वयक म्हणुन मनिषा कदम यांची निवड झाली तर नाशिक जिल्हा समन्वयक म्हणुन गजानन देवकत्ते यांची निवड करण्यात आली. सिन्नर तालुक्यासाठी एस.जी.पब्लिक स्कूल प्राथमिक विभागाचे उपक्रमशील शिक्षक विनायक काकुळते यांची निवड करण्यात आली. तर येवला तालुक्याचे समन्वयक म्हणुन बालाजी नाईकवाडी यांची निवड झाली. गोविंद गिरी यांची दिंडोरी,शिवलींग गायकवाड यांची सुरगाणा,राजेश्वर ठोंबरे यांची नांदगाव,शरद यादव यांची इगतपुरी तालुका समन्वयकपदी निवड झाली. सुत्रसंचालन नारायण भिलाने यांनी केलें, प्रास्ताविक बालाजी माने यांनी तर आभार औरंगाबादच्या मनिषा राऊत यांनी मानले.