विंचूरला स्वाइन फ्लुसदृश आजाराने तरु णाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 07:12 PM2018-09-19T19:12:24+5:302018-09-19T19:12:47+5:30

विंचूर : येथील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या आकिल लितफ मोमिन (४२) या तरु णाचा स्वाइन फ्लुसदृश आजाराने मृत्यू झाला. आकिल मोमिन यांना थंडी ताप आल्याने विंचूर येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना निमोनिया झाल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नाशिक येथील खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाल्याचे डॅक्टरांचे म्हणणे आहे.

Vinchur dies of swine flu pandemic | विंचूरला स्वाइन फ्लुसदृश आजाराने तरु णाचा मृत्यू

विंचूरला स्वाइन फ्लुसदृश आजाराने तरु णाचा मृत्यू

Next
ठळक मुद्देआरोग्य उपकेंद्रात कुठलीही व्यवस्था नसल्याने रु ग्णांना खाजगी रु ग्णालयात उपचार

विंचूर : येथील मोमीनपुरा भागात राहणाऱ्या आकिल लितफ मोमिन (४२) या तरु णाचा स्वाइन फ्लुसदृश आजाराने मृत्यू झाला.
आकिल मोमिन यांना थंडी ताप आल्याने विंचूर येथील खासगी रु ग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना निमोनिया झाल्याचे सांगितले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने त्यांना नाशिक येथील खाजगी रु ग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना स्वाइन फ्लू निष्पन्न झाल्याचे डॅक्टरांचे म्हणणे आहे.
स्वाइन फ्लू झाल्याने त्यांचे दोन्ही फुप्फुसे निकामी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची प्रकृती जास्तच खालावल्याने अखेर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यु झाला. पंचविस दिवस त्यांनी मृत्युशी झुंज दिली. विंचूर परिसरात खोकला, थंडी-ताप, पांढºया पेशी कमी होणे यासारखी लक्षण नागरिकांमध्ये दिसून येत आहे. परंतु येथील आरोग्य उपकेंद्रात कुठलीही व्यवस्था नसल्याने रु ग्णांना खाजगी रु ग्णालयात उपचार घ्यावे लागत आहे. मोमीन यांच्या पश्चात आई, वडिल, पत्नी, मुले असा परिवार आहे.

Web Title: Vinchur dies of swine flu pandemic

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.