विंचूर-लासलगाव रस्त्याची चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2021 04:12 AM2021-05-29T04:12:24+5:302021-05-29T04:12:24+5:30
लासलगाव : कांद्याचे आगार असलेल्या विंचूर-लासलगाव येथील रस्त्यांची अवस्था गंभीर झाली असून, वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. ...
लासलगाव : कांद्याचे आगार असलेल्या विंचूर-लासलगाव येथील रस्त्यांची अवस्था गंभीर झाली असून, वाहन चालविताना वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. विंचूर ते होळकरवाडी या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. या रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
विंचूर-लासलगाव या रस्त्याची तीन वर्षांपूर्वी काम केले होते; मात्र तीन वर्षांतच मोठ मोठे खड्डे पडले आहेत. वाहनचालकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे प्रवासाचा वेळ आणि खर्च वाढत असून वाहनांचे नुकसान होत आहे. आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असल्याने या रस्त्यावर नेहमी मोठी वर्दळ असते. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने किमान खड्डे तरी बुजवावे, अशी मागणी नागरिक करत आहे.
लासलगावच्या बाजारपेठेमध्ये शेतमाल लिलावासाठी आजूबाजूच्या ५० हून अधिक गावातील शेतकरी हे दाखल होत असतात. याचबरोबर अवजड वाहनांची रेलचेल मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. या मुख्य रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरश: चाळण झालेली आहे. याचा फटका शेतकऱ्यांचा सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.