शाळा बंदीवर जिल्हा परिषद शाळा टाकळी विंचूरने केली मात..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 06:41 PM2020-08-31T18:41:12+5:302020-08-31T18:41:52+5:30
लासलगाव : कोविड १९ मध्ये शाळाबंदी झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या टाकळी विंचूर शाळेने शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिलेला नाही.यासाठी आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पद्धतींचा सुरेख मेळ शाळेने घातला आहे.
लासलगाव : कोविड १९ मध्ये शाळाबंदी झाल्याने विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. मात्र निफाड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या टाकळी विंचूर शाळेने शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू दिलेला नाही.यासाठी आॅनलाईन व आॅफलाईन दोन्ही पद्धतींचा सुरेख मेळ शाळेने घातला आहे.
शाळेतील सर्व शिक्षक व पालक यांचे आॅनलाईन टूल्सचे प्रशिक्षण घेतले. सर्व शिक्षक गुगलमीटवर जुलैपासून रोज क्लासेस घेत आहेत. एकूण ४० पटापैकी १४० पेक्षा अधिक विद्यार्थी रोज गुगलमीटवर आॅनलाईन क्लासेससाठी हजर असतात. मोबाईल नसणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोबाईल मित्र ही संकल्पना राबवून अधिक विद्यार्थी शिक्षण प्रवाहात आणले आहेत.
आॅफलाईन विद्यार्थीसंख्या निश्चित झाल्यावर मुख्याध्यापक वाळीबा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली मळेवस्ती, शाळा परिसर व चंदनवाडी या भागात सकाळी ९.३०ते११.३० ह्या वेळेत अध्ययन केंद्रे सुरु केलेली आहेत. याठिकाणी मास्क, सॅनिटायजर्स व सोशल डिस्टंसिंगचे पालन करून रोज अध्यापन सुरू आहे. परशुराम ठाकरे, पृथ्वीराज भदाणे व गजानन उदार आॅफलाईन वर्ग भरवित आहेत.
आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने शिक्षण चालू ठेवण्यासाठी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासाहेब मोकाटे व सर्व सदस्य तसेच शाळेतील शिक्षक संजय देवरे, बायजा भदाणे, विमल केकाण, प्रगिता अहिरे व सुरेखा बेंडके सातत्याने प्रयत्नरत आहेत. शाळा बंद असली तरी शिक्षण चालू असण्यासाठी प्रयत्न करणाºया जिल्हा परिषद टाकळी विंचूर शाळेचे परिसरात कौतुक होत आहे.
कोट्स:
शाळेतील सर्व शिक्षक आॅनलाईन व आॅफलाईन पद्धतीने विद्यार्थ्यांना अध्यापन करत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले आहे. शालेय व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत प्रशासनाकडून आॅक्सीमीटर व थर्मल स्कॅनर घेण्यासाठी प्रयत्नरत आहे. जेणेकरु न अध्ययन केंद्रे अधिक सुरक्षित होतील.
- बाळासाहेब मोकाटे, शालेय व्यवस्थापन अध्यक्ष,
जिल्हा परिषद शाळा टाकळी विंचूर
आम्ही जूनअखेर आॅनलाईन व आॅफलाईन विद्यार्थ्यांचे वर्गीकरण केले. शाळेतील सहकारी,पालक व केंद्रातील शिक्षकांना आॅनलाईन टूल्सचे प्रशिक्षण दिले. याशिवाय जिल्ह्याच्या कंटेट विकसन ग्रुपद्वारे व्हिडिओ व वर्कशीट निर्मिती केली. अध्ययन केंद्र ह्या नाविन्यपूर्ण संकल्पनेतून आॅफलाईन विद्यार्थीही आज शिक्षण घेत आहेत.
- गजानन उदार,तंत्रस्नेही शिक्षक.