विंचूरदळवीला ‘अस्वच्छतेच्या रावणा’चे दहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 06:01 PM2018-09-26T18:01:57+5:302018-09-26T18:02:38+5:30
सिन्नर तालुक्यातील विंचूर दळवी येथे शनैश्वर मित्रमंडळ व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमाने अस्वच्छतेचे रावण दहन करण्यात आले. ग्रामविकास अधिकारी संजय गिरी यांनी ‘अस्वच्छतेच्या रावणा’ला अग्नी दिला. अस्वच्छतेचे रावण दहन व गणेश विसर्जन मिरवणुकीने गावात प्रदक्षिणा घातली.
स्वच्छतेचे जागर करणारे संत गाडगे महाराज यांची वेशभूषा केलेले ग्रामपंचायतीचे कर्मचारी नारायण दळवी हे मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरले. लहान मुलांनी पारंपरिक वेशभूषा करून हातात टाळ मृदुंग घेतला होता. महिलांनी पारंपरिक नववारी साडी परिधान करून हातात प्लॅस्टिक बंदीचे व साथीच्या आजाराविषयक फलक धरत स्वच्छतेची जगजागृती केली. स्वच्छतेसह प्लॅस्टिक बंदीच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यावेळी मंडळातील सामाजिक कार्यकर्ते गोरख भोर, संजय बैरागी, उत्तम वराडे, सुनील शेटे, सोमनाथ भावले, तुकाराम वराडे, अक्षय बैरागी, वैभव भोर, सुरज चंद्रे, अक्षय शेटे, किरण शेळके, मयुर पोरजे, राजू शेळके, आदित्य भोर, दीपक वराडे, संदीप वराडे, विकास वैष्णव, सौरभ कुलकर्णी आदिंसह ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घरासह आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत प्रयत्न करण्याचे आवाहन केले. ग्रामविकास अधिकारी गिरी यांनी गावकऱ्यांना स्वच्छतेची माहिती दिली. मिरवणुकीची सांगता ग्रामपंचायत कार्यालय परिसरात करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी आरती वराडे, समाजप्रबोेधनकार संदीप गायकर यांनी साथीचे आजार रोखण्यासाठी व प्लॅस्टिक वापरामुळे होणाºया दुष्परिणामाविषयी मार्गदर्शन केले.