विंचूरदळवी विमा ग्राम घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:39 AM2019-08-23T00:39:12+5:302019-08-23T00:39:45+5:30

भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.

VincurDalvi Insurance Village Announced | विंचूरदळवी विमा ग्राम घोषित

सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावास विमा ग्रामचे प्रमाणपत्र सरपंच संगीता पवार यांना प्रदान करताना एलआयसीचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक तुळशीदास गडपायले. समवेत राजेंद्र पवार, समीर नाईक, सचिन कापडणीस, निवृत्ती अरिंगळे, भारती दळवी, संजय गिरी, नंदू शेळके, पुष्पा शेळके, दिलीप दळवी, हरिभाऊ दळवी, आरती भोर आदी.

Next

विंचूरदळवी : भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी विमा ग्राम घोषित करण्यात आले आहे.
ग्रामपंचायतीस एक लाख रुपये देण्यात येणार आहे. विमा ग्रामचे एक लाख आणि संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानाचे ५० हजार अशा दीड लाखाच्या रकमेतून गावात स्वच्छतागृह बांधण्यात येणार असून, त्याचा शुभारंभही नुकताच मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
गाव विमा ग्राम घोषित केल्यानंतर विमा फलकाचे अनावरण एलआयसीचे वरिष्ठ विभागीय प्रबंधक तुळशीदास गडपायले, नाशिकरोडचे मुख्य शाखा प्रबंधक राजेंद्र पवार, सिन्नरचे शाखा प्रबंधक समीर नाईक, सचिन कापडणीस, विकास अधिकारी निवृत्ती अरिंगळे, शांताराम गामणे, मुख्य सल्लागार नंदू शेळके, सरपंच संगीता पवार, उपसरपंच भारती दळवी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. दरम्यान एलआयसीच्या अधिकाऱ्यांची फेटे बांधून सजविलेल्या बैलगाडीतून गावातून वाजतगाजत मिरवणूक काढण्यात आली.
मारुती मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या सर्व मान्यवरांचे गावकऱ्यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. विमा ग्रामसाठी महत्त्वाचे योगदान देणारे मुख्य सल्लागार नंदू शेळके, पुष्पा शेळके, दिलीप दळवी, हरिभाऊ दळवी, आरती भोर यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संजय गिरी यांनी केले.
देशाच्या विकासात हातभार
कमी बचत आणि सामान्यांना परवडणारे आणि सुरक्षिततेची हमी असणारे प्लॅन एलआयसीत उपलब्ध आहेत. त्यामुळे खासगी विम्याऐवजी नागरिकांनी एलआयसीत गुंतवणूक करावी. एलआयसीचा पैसा राष्ट्रीय उपक्रमात गुंतविला जातो. त्यामुळे देशाच्या विकासात एकप्रकारे आपला हातभार लागतो, असे प्रतिपादन तुळशीदास गडपायले यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले.

Web Title: VincurDalvi Insurance Village Announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.