द्राक्षबागेत  कलिंगड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 12:20 AM2018-03-29T00:20:30+5:302018-03-29T00:20:30+5:30

वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धती आणि बाजारभाव यामुळे शेती नेहमीच तोट्यात येत असते. मात्र अनेक तरु ण शेतकरी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धतीत बदल, पाण्याचे नियोजन, आंतरपीक पद्धतीचा वापर यामुळे शेती काही अंशी फायदेशीर ठरत आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीचे नियोजन करून पर्यायी उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

Vineyard | द्राक्षबागेत  कलिंगड

द्राक्षबागेत  कलिंगड

googlenewsNext

वर्षानुवर्षे पारंपरिक पद्धती आणि बाजारभाव यामुळे शेती नेहमीच तोट्यात येत असते. मात्र अनेक तरु ण शेतकरी शेतीकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून पाहू लागले आहेत. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञान, पीक पद्धतीत बदल, पाण्याचे नियोजन, आंतरपीक पद्धतीचा वापर यामुळे शेती काही अंशी फायदेशीर ठरत आहे. एकाच पिकावर अवलंबून न राहता आंतरपीक पद्धतीचे नियोजन करून पर्यायी उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.  भेंडाळी येथील तरुण शेतकरी शरद कमानकर यांनी द्राक्षबागेतील दोन सºयांमधील ९ फूट अंतरामध्ये कलिंगडांची लागवड केली आहे. द्राक्ष लावल्यानंतर किमान दोन वर्षे शेतकºयांना ते सांभाळावे लागते. दरम्यानच्या काळात झाडे पाच फूट उंचीची करणे, मंडप करणे, परिपक्व काडी तयार करून फळ धारणा तयार केली जाते. त्यासाठी प्रचंड प्रमाणात खते, औषधे द्यावी लागतात. यासाठी खूप खर्च येतो. शिवाय दोन वर्षे कोणतेही उत्पादन होत नाही. अशावेळी द्राक्षबागेसाठी होणारा खर्च किमान वसूल व्हायला हवा, या धोरणातून परिसरात नसलेले वेलवर्गीय कलिंगडाचे पीक आंतरपीक म्हणून कमानकर यांनी आपल्या एक एकर द्राक्षबागेत घेतले.कलिंगड फारसे या परिसरात होत नाही तरीदेखील मिल्चंग पेपर, ड्रीप, यावर कलिंगडाची लागवड केली असून, पीक खूपच बहरले आहे.  आजच्या बाजारभावात कमानकर यांना नक्कीच चार पैसे मिळणार असून, द्राक्ष पिकाच्या वाढीसाठी येणारा खर्च त्यातून भागवता येणार आहे. शरद कमानकर हे आपल्या शेतीत नेहमीच विविध प्रयोग करत असल्याने शेती फायद्यात रहात आहे. परिसरात कलिंगडाची लागवड आणि द्राक्षबागेतील आंतरपीक यामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.  दोन महिन्यांत कलिंगड परिपक्व झाले असून, पुढील आठवड्यात बाजारात विक्रीसाठी नेणार आहे. एक एकर क्षेत्रावर दोन हजार  रोपांची लागवड केली आहे. आज किमान ८० ते ९० टन उत्पादन मिळण्याची शक्यता आहे. आज किमान ६ ते ८ रु पये किलो या भावाने विक्र ी सुरू आहे.

Web Title: Vineyard

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी