द्राक्षपंढरी धोक्यात !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 02:37 PM2019-11-15T14:37:34+5:302019-11-15T14:37:50+5:30
सायखेडा : परतीच्या पावसाने सलग चौदा दिवस थैमान घातल्याने नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असणारी द्राक्ष पंढरी अर्थातच निफाड तालुक्यातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या असून सहा वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे संभाळलेल्या बागांवर कु-हाड चालविण्याची वेळ आली आहे.
सायखेडा : परतीच्या पावसाने सलग चौदा दिवस थैमान घातल्याने नाशिक जिल्ह्यात अग्रेसर असणारी द्राक्ष पंढरी अर्थातच निफाड तालुक्यातील द्राक्ष बागा धोक्यात आल्या असून सहा वर्षे पोटच्या मुलाप्रमाणे संभाळलेल्या बागांवर
कु-हाड चालविण्याची वेळ आली आहे. निफाड येथील देवराम गाजरे यांनी आपल्या शेतात सहा वर्षे पूर्वी तीन एकर बाग लावली होती. दोन वर्षांनंतर फळ आले. त्यात मागील वर्षी दुष्काळ बाग उभी राहिली. कधी सुलतानी तर कधी अस्मानी संकटाचा सामना करावा लागला. यंदा फळधारणे नंतर जवळपास दोन मिहने बाग सांभाळली, तीन एकर बागेसाठी लाखो रु पये खर्च केला आणि अवघ्या काही दिवसात बाग विक्र ीसाठी उपलब्ध होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असतांना अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे लाखो रु पयांचा आणि सर्व स्वप्नांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे
उन्हाळ्यात खरड छाटणी आणि आॅगष्ट महिन्यातील गोडबार छाटणीनंतर आलेला खर्च लाखो रु पये आहे. हा खर्च वाढत चालला बाग हातातून गेली, पुढील वर्षी नव्याने भांडवल कुठून उपलब्द करणार, सरकारी यंत्रणा कुचकामी ठरत आहे, पंधरा दिवस उलटूनही कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही त्यामुळे शेतकरी बागा तोडण्याचा निर्णय घेत आहे.