धुळीमुळे निळवंडीतील द्राक्षबागा संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 10:14 PM2020-03-04T22:14:49+5:302020-03-04T22:20:02+5:30
दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.
दिंडोरी : दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य सर्वत्र पसरले असून शेतकर्?यांच्या द्राक्षबागांनाही या धुळीचा मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यामुळे त्वरीत या रस्त्याचे नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी नागरिकांनी व वाहनचालकांनी केली आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून दिंडोरी-निळवंडी-हातनोरे, निळवंडी-पाडे या रस्त्याच्या दुरावस्थेची समस्या कायम आहे. अनेक वेळा येथील शेतकऱ्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना व लोकप्रतिनिधींकडे तक्र ारी करु नही काहीच उपयोग होत नाही. अधिकाºयांकडून उडवाउडवीचे उत्तरे दिली जातात. नागरीकांच्या प्रश्नांना संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी केराची टोपली दाखवत आहे. अतिषय महत्वाचा असणारा हा रस्ता वाहतुक व बाजारपेठेच्या दृष्टीने महत्वाचा मानला जातो. पण याबाबत कोणालाही सोयरे सुतूक नाही. सध्या द्राक्ष काढणीला वेग आला आहे.
सून या रस्त्यामुळे परराज्यातील व्यापारी या भागात फिरकत नसल्याने शेतकर्?यांची आर्थिक कोंडी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास या धुळीने हिरावून घेतला आहे. नागरिकांच्या आरोग्यावर या धुळीचा परिणाम होत असल्याने रु ग्णांच्या संख्येतही दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे दिंडोरी-निळवंडी-हातनोरे या रस्त्याची दुरु स्ती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांनी व शेतकर्?यांनी केली आहे.
दिंडोरी-निळवंडी-हातनोरे हा रस्ता अतिशय खराब झाला आहे. या खराब रस्त्यामुळे धुळीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढला आहे. या धुळीमुळे रस्त्याच्या बाजूला असलेल्या द्राक्षबागा संकटात आल्या आहे. या धुळीमुळे घड खराब होतात. त्यामुळे व्यापारी वर्ग या द्राक्षबागा खरेदीसाठी दुर्लक्ष करीत असतात.
सुनील कृष्णा पाटील शेतकरी, निळवंडी
दिंडोरी निळवंडी हातनोरे रस्ता अत्यंत महत्वाचा आहे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून सदर रस्त्याची दुरावस्था झाली आहे सदर रस्ता नूतनिकरणाबाबत माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांच्या दोन वर्षांपूर्वी झालेल्या आढावा बैठकीत अधिकार्यांनी सदर रस्ता पंतप्रधान ग्राम सडक योजनेत मंजूर झाल्याचे सांगत लवकरच काम सुरू होईल असे आश्वासन दिले होते मात्र अद्याप सदर रस्त्याचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.