विंचूर चौफुलीने घेतला मोकळा श्वास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 12:16 AM2018-04-26T00:16:40+5:302018-04-26T00:16:40+5:30
शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे.
येवला : शहरातील शनिपटांगण, विंचूर चौफुली, बसस्थानकासह नगर -मनमाड महामार्गाच्या कडेला अनेक वर्षांपासून अतिक्रमण केलेल्या दोनशेहून अधिक टपऱ्या, स्टॉलवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केल्याने या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. रहदारीच्या रस्त्यांवरील अतिक्रमित टपºया, दुकानांवर कारवाई करावी, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती. सोमवारी पालिका मुख्य अधिकारी संगीता नांदूरकर यांनी दखल घेत अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. कारवाई सुरू झाली तेव्हा परिसरात एकतर्फी अतिक्रमण काढण्याची गरजेची मोहीम सुरु झाली. आचार संहिता सुरू असल्याने अतिक्रमण हटाव मोहिमेला कोणत्याही कार्यकर्त्यांकडून वा विक्रेते, फेरीवाल्यांचा जमाव एकत्र येणे, घोषणाबाजी असा कोणताही विरोध झाला नाही.
येवलावासीयांमध्ये समाधानाची भावना
विंचूर चौफुली भागातील रस्त्याच्या कडेला तसेच भाजी बाजार परिसरात रस्त्याच्या आजूबाजूला भाज्या, फळे, चपला, चहा- कपडे विक्रीच्या अनेक टपºया थाटण्यात आल्या होत्या. त्यामुळे या भागात नेहमी वाहतूक कोंडी व्हायची. वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता. पालिकेने कारवाई केल्याने येवलावासीयांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.