लॉकडाऊनचे उल्लंघन,
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:19 PM2020-07-23T21:19:31+5:302020-07-24T00:17:16+5:30
सिन्नरला ६९२ गुन्हे दाखलसिन्नर : कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सरकारकडून करण्यात येर्णाया उपाय योजना अमलात आणण्यासाठी लॉकडाउन काळात सूचनांचे पालन न केल्याने तालुक्यात आजपर्यंत तीन पोलिस ठाण्यात ६९२ गुन्हे दाखल झाले आहेत.

सिन्नर शहर व उपनगरात नव्याने १४ दिवसाचे लॉकडाऊन सुरू करण्यात आले असून उल्लंघन करर्णाया नागरिकांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिस निरीक्षक साहेबराव पाटील यांनी दिला आहे.मास्क न लावणे, विनाकारण घराबाहेर पडणे, गर्दी करणे, फिजिकल डिस्टन्स न पाळणे अशावेळी गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. सिन्नर पोलिसांनी आत्तापर्यंत ३१७, एमआयडीसी पोलिसांत १२७ व वावी पोलिस ठाण्यात २४८ जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. नागरिकांनी सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पोलिस निरीक्षक पाटील यांनी केले आहे.