लॉकडाउनचे उल्लंघन; नगरसूलला सात गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2020 10:43 PM2020-04-23T22:43:24+5:302020-04-24T00:13:27+5:30
नगरसूल : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
नगरसूल : कोरोना विषाणूच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉकडाउनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले.
येथील ग्रामस्थांसह व्यावसायिक, दुकानदार व भाजीपाला, द्राक्षे, फळविक्रेते हे जगात, देशात, राज्यात व जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने मुख्यमंत्र्यानी लॉकडाउन, सोशल डिस्टन्सिंगचे वारंवार आव्हान करीत असून, पोलीस अधिकारी, कर्मचारी वारंवार आव्हान करीत असून त्याकडे हे विनाकारण दुर्लक्ष करीत आहे. याआधी काहींना पोलीस ठाण्यात नेवून समजही दिली होती.
पण हे व्यावसायिक ऐकत नसल्याने शेवटी गुरुवारी त्यांच्यावर येवला तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने नगरसूल येथील सात दुकानदार, त्यात किराणा, कृषी सेवा, हार्डवेअर यांच्यावर भारतीय दंड गुन्हे कलम १४४/२ चे उल्लंघन, १८८, १६९, १७० प्रमाणे गुन्हा दाखल केला. पोलीस पथकात जमादार राजपूत, पोलीस हवालदार सोनवणे, गडाख आदी होते.