पोलिस अन् कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रावर नियमांचं उल्लंघन

By Suyog.joshi | Published: May 20, 2024 12:03 PM2024-05-20T12:03:57+5:302024-05-20T12:04:15+5:30

मतदान केंद्रावर खोलीत असलेल्या कर्मचारी तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील हिंदी भाषिक पोलिस कर्मचाऱ्यांकडून थेट नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले.

Violation of rules at polling station by police and staff | पोलिस अन् कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रावर नियमांचं उल्लंघन

पोलिस अन् कर्मचाऱ्यांकडून मतदान केंद्रावर नियमांचं उल्लंघन

पंचवटी, नाशिक (संदीप झिरवाळ) : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदान केंद्रावर मतदान करण्यासाठी जातांना मतदारांना मोबाईल नेण्यासाठी बंदी घालण्यात आली असली तरी मतदान केंद्रावर खोलीत असलेल्या कर्मचारी तसेच बाहेरच्या जिल्ह्यातील हिंदी भाषिक पोलिस कर्मचाऱ्यांकडून थेट नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याचे दिसून आले.

एकीकडे मतदारांना मोबाईल नेण्यासाठी बंदी घातली होती तर दुसरीकडे पोलिस आणि मतदान केंद्रात असलेले कर्मचारी बिनधास्तपणे मोबाईलवर संभाषण साधत असल्याचे दिसून आले. तर मतदान केंद्रात व केंद्रा बाहेर असलेले  पोलिस मतदान करण्यासाठी जाणाऱ्या मतदार बांधवांना मोबाईल नेऊन देत नसल्याने आमचे मोबाईल तुम्ही सांभाळा असे म्हणत काहींनी संतापाच्या भरात मतदान न करता माघारी फिरण्याचा प्रयत्न केला.

Web Title: Violation of rules at polling station by police and staff

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक