संचारबंदीचे उल्लंघन; सहा जणांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2020 11:58 PM2020-04-02T23:58:55+5:302020-04-02T23:59:10+5:30
कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असतांनाही शहरात विनाकारण घराच्या बाहेर पडल्याने शहरातील सहा तरु णांवर गुरु वार दि.२ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
पिंपळगाव बसवंत : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदीचे आदेश असतांनाही शहरात विनाकारण घराच्या बाहेर पडल्याने शहरातील सहा तरु णांवर गुरु वार दि.२ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीचे आदेश लागू केले आहेत. असे असतांना आदेशाचे उल्लंघन करून शहरात बेफिकीरीने संचार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे पोलीस निरीक्षक संजय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सपकाळे ,उपनिरीक्षक युवराज सैदाणे व पोलीस कर्मचाऱ्यांनी पुन्हा शहरातील ६ जणांवर कलम १८८ व २६९ प्रमाणे गुन्हा दाखल केला त्यातील दोघे होम क्वॉरंटाईन तर चौघे शहरात अनावश्यक फिरत होते. त्यानुसार संबंधितावर कारवाई करण्यात आली़
कोरोना व्हायरस रोखण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे. बाहेर न पडता कुटुंबाला व आपल्याला सुरक्षित ठेवावे.अन्यथा फिरणाºया व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
- कुणाल सपकाळे,
सहाय्यक पोलीस निरीक्षक