पोलिसांतील तक्रार मागे घेत नसल्याने एकावर वस्तऱ्याने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 17:46 IST2018-08-27T17:45:49+5:302018-08-27T17:46:49+5:30
नाशिक : पोलिसांतील तक्रार मागे घे, असे म्हणत दोघांनी पादचा-यावर वस्त-याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि़२६) भद्रकालीतील तलावडी येथे घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अझर फारूख शेख (३०, रा. खडकाळी) यास अटक केली असून, त्याचा साथीदार शाहरूख शेख फरार झाला आहे.

पोलिसांतील तक्रार मागे घेत नसल्याने एकावर वस्तऱ्याने वार
नाशिक : पोलिसांतील तक्रार मागे घे, असे म्हणत दोघांनी पादचा-यावर वस्त-याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि़२६) भद्रकालीतील तलावडी येथे घडली़ या प्रकरणी भद्रकाली पोलिसांनी अझर फारूख शेख (३०, रा. खडकाळी) यास अटक केली असून, त्याचा साथीदार शाहरूख शेख फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोसीन सादीक पठाण (३४, पंचशीलनगर) यांनी दिलेच्या फिर्यादीनुसार दुपारी अडीच वाजेच्या सुमारास तलावडी येथून पायी जात असताना संशयित अझर व फारुक शेख यांनी पाठीमागून येत पोलिसांकडे दिलेली तक्रार मागे घे, असे म्हणत वस्त-यासारख्या हत्याराने डोक्यावर व पाठीवर वार केले़ यामध्ये पठाण जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़
प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़