भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखणातच मुख्यमंत्र्यांचा वेळ वाया- राधकृष्ण विखेंचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 03:40 PM2017-09-15T15:40:02+5:302017-09-15T15:41:05+5:30

Violence of Chief Minister's time in the backdrop of corrupt ministers - Ramkrishna Vichane's allegations | भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखणातच मुख्यमंत्र्यांचा वेळ वाया- राधकृष्ण विखेंचा आरोप

भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखणातच मुख्यमंत्र्यांचा वेळ वाया- राधकृष्ण विखेंचा आरोप

Next
ठळक मुद्देकथनी आणि करणीत मुख्यमंत्र्यांनी एकवाक्यता ठेवली पाहीजे.हजारो कोटींच्या समृद्धी महामार्ग आणि मेट्रो रेल्वेच्या स्वप्नातून आता मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडून कुपोषण आणि बालमृत्यूचे वास्तव ओळखले पाहीजे


नाशिक : आरोग्य, महिला व बालकल्याण आणि आदिवासी विकास या तीन तीन खात्याच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप होत असताना त्यांना पाठीशी घालण्याचे काम मुख्यमंत्री करीत आहेत. नाशिकचे बालमृत्यू हे सरकारचे मोठे अपयश असून, थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर त्यांनी तात्काळ नाशिक बालमृत्यूची जबाबदारी स्विकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण-विखे पाटील यांनी केली.
जिल्हा रूग्णालयातील नवजात बालके मृत्यू प्रकरणी शुक्रवारी (दि.१५) विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाला भेट देवून या बालमृत्यूंची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडून घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना त्यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला. भ्रष्ट मंत्र्यांची पाठराखण करण्यातच मुख्यमंत्र्यांचा वेळ वाया जातोय. त्यामुळे मंत्री आणि सचिव बेफिकीर झाले आहेत. आदिवासी विकास विभागातील रेनकोट खरेदीसह अनेक भ्रष्टाचार आपण बाहेर काढले. त्याची चौकशी एसआयटीमार्फत करण्याची आपली मागणी होती. प्रत्यक्षात आदिवासी विकासमंत्र्यांनी ती चौकशी उद्योग विभागाकडून करण्याचे जाहीर केले.उद्योग विभागातीलच अनेक भ्रष्टाचाराचे ‘उद्योग’ समोर आले असताना ते काय आणखी या भ्रष्टाचाराची चौकशी करणार असा पलटवार त्यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी आता मी मुख्यमंत्री बोलतोय, हे सोडून कृती करणेच अधिक योग्य राहील. कथनी आणि करणीत मुख्यमंत्र्यांनी एकवाक्यता ठेवली पाहीजे. इतके बालमृत्यू होवूनही मुख्यमंत्र्यांनी अद्याप नाशिकला भेट दिलेली नाही. हजारो कोटींच्या समृद्धी महामार्ग आणि मेट्रो रेल्वेच्या स्वप्नातून आता मुख्यमंत्र्यांनी बाहेर पडून कुपोषण आणि बालमृत्यूचे वास्तव ओळखले पाहीजे, असा टोलाही त्यांनी मारला. यावेळी माजीमंत्री डॉ. शोभा बच्छाव, शहराध्यक्ष शरद अहेर, डॉ. हेमलता पाटील, डॉ. ममता पाटील, शाहू खैरे, आशा तडवी, लक्ष्मण जायभावे, बबलू खैरे आदी उपस्थित होते.

Web Title: Violence of Chief Minister's time in the backdrop of corrupt ministers - Ramkrishna Vichane's allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.