शहरात भाजपविरोधात जोरदार निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 10:10 PM2020-07-23T22:10:17+5:302020-07-24T00:27:56+5:30
नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी (दि.२२) राज्यसभेत राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी, जय शिवाजी’ असा उल्लेख केला. त्यामुळे राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजे यांना समज दिल्याचा आरोप करीत शिवसेनेने शालिमार येथील पक्ष कार्यालयासमोर भाजपा विरोधात तीव्र घोषणा बाजी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला विरोध करणे ‘हेच का तुमचे हिंदुत्व’ असा सवाल शिवसेनेने भाजपला केला आहे. व्यंकय्या नायडू यांच्या भूमिकेतून भाजपचीच भूमिका स्पष्ट होते. असा आरोप करीत शिवसेनेने नायडू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत भाजपा विरोधात घोषणा बाजी केली.
----------------
भाजपावर आरोप
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेला विरोध करण्याची भूमिका ही व्यंकय्या नायडू यांच्यासोबत भाजपचीही असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सत्तेवर आलेल्या भाजपला या देशातील जनताच धडा शिकवेल, असा इशाराही शिवसेनेतर्फे देण्यात आला.
४प्रारंभी शिवेसना कार्यालयासमोर जमलेल्या कार्यकर्त्यांनी तीव्र घोषणाबाजी करीत भाजपच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाला आक्षेप घेणारे नायडू हे भाजपचे नेते असल्याने ही भाजपची भूमिका असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. यावेळी घोषणा बाजी करण्यात आली.