येवल्यात आंदोलनाला हिंसक वळण

By admin | Published: June 2, 2017 12:53 AM2017-06-02T00:53:23+5:302017-06-02T00:53:35+5:30

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : शेतकऱ्यांच्या संपाला येवला येथे हिंसक वळण लागले़ गाड्यांवर दगडफेक करण्यासह वाहनांचे नुकसान करण्याच्या घटना घडल्या

Violent turn of the movement in Yeola | येवल्यात आंदोलनाला हिंसक वळण

येवल्यात आंदोलनाला हिंसक वळण

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : शेतकऱ्यांच्या संपाला येवला येथे हिंसक वळण लागले़ गाड्यांवर दगडफेक करण्यासह वाहनांचे नुकसान करण्याच्या घटना घडल्या, दरम्यान, संपाचा आठवडे बाजारावर परिणाम झाल्याचे दिसून आले़
येवल्यात अश्रुधुराचा मारा
गुरु वारी दुपारी आंदोलनाला हिंसक वळण लागले. पिंपळगाव जलाल टोलनाक्यावर दगडफेक करून गाड्यांचे नुकसान केले. यामध्ये पोलिसांच्या गाडीचे नुकसान झाल्याचे वृत्त आहे. दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी झाला. पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांच्यासह राज्य राखीव दलाची कुमक तत्काळ घटनास्थळी आली. यावेळी पोलीस अधीक्षक अंकुश शिंदे यांनी अश्रुधुराचा मारा करण्याचे आदेश दिले. यात चार अश्रुधुराच्या नळकांड्यांपैकी एक नळकांडे उंदीरवाडी येथील शेतकरी बापूसाहेब जाधव यांच्या पायावर लागल्याने ते जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालयात आणण्यासाठी दोन युवकानी पुढाकार घेतला. मात्र आंदोलनकर्ते समजून उंदीरवाडी येथील सुनील राजुळे व दत्तात्रय पवार यांना पोलिसांनी लाठीचा प्रसाद दिला. या आंदोलनात पोलीस नाईक समाधान पाटील यांना डोक्याला दगड लागला असून, त्यांना येवला ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, पोलिसांनी प्लॅस्टिक बुलेटचे दोन राउंड फायर केल्याने आंदोलनकर्ते पसार झाले. सायंकाळी पोलिसांच्या हस्तक्षेपाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.
नांदुरी घाटात वाहनांची तपासणी
किसान क्र ांती मोर्चा व कळवण तालुक्यातील शेतकऱ्यांनी पुकारलेल्या संपाला कळवण तालुक्यात प्रतिसाद मिळाला असून, गुजरातकडे भाजीपाला व दूध जाऊ नये यासाठी नांदुरी घाटात तळ ठोकून वाहनांची तपासणी केली जात आहे.
नांदुरी घाटातील कळवण- दिंडोरी हद्दीत नाशिककडे भाजीपाला घेऊन जाणारी वाहने अडवून वाहनांची तपासणी करून भाजीपाल्याची वाहने माघारी पाठवली. शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार व शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कारभारी अहेर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, पोपट पवार यांनी आक्र मक भूमिका घेऊन दुपारी नांदुरी घाटात तळ ठोकून वाहने माघारी फिरवली. तालुकाध्यक्ष अ‍ॅग्रो डीलर असोसिएशनने शेतकरी संपाला पाठिंबा दिला असल्याची माहिती शेतकरी सेवा केंद्राचे संचालक राजेंद्र मालपुरे यांनी दिली. आंदोलनात पोपट पवार, दिलीप देशमुख, राजेंद्र अहेर, रत्नाकर गांगुर्डे, शिवाजी रौंदळ, संदीप पगार, रमेश वाघ आदींसह तालुक्यातील शेतकरी बांधव सहभागी झाले होते.
आठवडे बाजारावर परिणाम
न्यायडोंगरी : शेतकरी संपात ग्रामीण भागातील शेतकरी वर्गाने सक्रिय सहभाग नोंदवला असून, तालुक्याचा आठवडे बाजारासह ग्रामीण भागात चांगलाच परिणाम जाणवत आहे. पालेभाज्या, दूध मिळेनासे झाले आहे.
शेतकऱ्यांनी रस्त्यावरील भाजीपाला व्यापाऱ्यांची गाडी अडवून भाजी रस्त्यावर फेकण्याचा प्रकार अनेक ठिकाणी पाहावयास मिळाला. न्यायडोंगरी व परिसरातील पिंपरखेड, जळगाव खुर्द, सावरगाव, परधाडी, बाभूळवाडी या भागातील शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी व शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुकारलेल्या संपात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
न्यायडोंगरी परिसरातील शेतकऱ्यांनी येथील तलाठी यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन दिले.

Web Title: Violent turn of the movement in Yeola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.