दहीहंडीच्या उत्साहावर विरजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 06:50 PM2020-08-12T18:50:37+5:302020-08-12T18:52:54+5:30

कसबे सुकेणे : येथे व मौजे सुकेणेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणा-या दहीहंडीच्या उत्साहात यंदा माञ कोरोनाचे विरजन पडले. तरीही धार्मिक परंपरा म्हणुन दत्त मंदिरात सुकेणेकर संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रामुख्याने कोकणातुन याठिकाणी हजारो भाविक येतात यंदा मात्र या भागातील एकही भाविक उपस्थित नव्हता.

Virjan on the excitement of curd | दहीहंडीच्या उत्साहावर विरजन

दहीहंडीच्या उत्साहावर विरजन

Next
ठळक मुद्देश्रीकृष्ण जन्मोत्सव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे सुकेणे : येथे व मौजे सुकेणेत दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केल्या जाणा-या दहीहंडीच्या उत्साहात यंदा माञ कोरोनाचे विरजन पडले. तरीही धार्मिक परंपरा म्हणुन दत्त मंदिरात सुकेणेकर संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. प्रामुख्याने कोकणातुन याठिकाणी हजारो भाविक येतात यंदा मात्र या भागातील एकही भाविक उपस्थित नव्हता.
श्रीक्षेञ मौजे सुकेणे दत्त मंदिरात श्रीकृष्ण जन्मोत्सव आणि देवाची दहीहंडी असा उत्सव दरवर्षी होतो. यंदा कोरोना मुळे दत्त मंदिरात भाविकांना प्रवेश बंदी आहे. त्यामुळे मंदिरात निवासी असलेल्या सुकेणेकर संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. महंत सुकेणेकर यांच्या अध्यक्षतेखाली पुज्य अर्जुनराज सुकेणेकर यांनी पोथी वाचन केले. यावेळी पुज्य बाळकृष्णराज सुकेणेकर, पुज्य गोपीराजशास्ञी सुकेणेकर, पुज्य राजधरराज सुकेणेकर , तपस्वीनी सुभद्राताई सुकेणेकर आदी उपस्थित होत्या. मध्यरात्री श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करून आरती ,विडा अवसर झाला. आज सकाळी मिरवणुक न काढता देवाची दहीहंडी मंदिरातच पुजा करुन फोडण्यात आली.कोरोनामुळे यंदा कोकणातील भाविकांची अनुपस्थिती होती, केवळ मोजक्या संतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला, भाविकांविना सोहळा होणे ही पहिली वेळ आहे.गेल्या चार महिन्यापासून कोरोनामुळे मंदिरे बंद करण्यात आलेली आहे. कृष्णजन्म मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये पार पडला.
- अर्जुनराज सुकेणेकर ,
दत्त मंदिर संस्थान, सुकेणेश्रीकृष्ण मूर्र्तीला मास्क लावून गोकुळाष्टमी साजरीचांदोरी : देव भक्तांना सर्व संकटातून वाचवतो, अशी भक्तांची श्रद्धा असते. तरीही माणसाला हानिकारक ठरणाऱ्या गोष्टींचा देवाला त्रास होतो या काळजीच्या भावनेतून भक्त देवाच्या मूर्तींची काळजी घेतात. उन्हाळ्यात उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चंदन लावतात तर हिवाळ्यात थंडी वाजू नये म्हणून ब्लँकेट पांघरवतात तसेच काहीसे चांदोरी या गावात केले गेले. जगावर असलेल्या कोरोनाचे संकट बघता राधा-कृष्णाच्या मूर्र्तीला मास्क लावत भक्तांनी गोकुळाष्टमी साजरी केली.
नाशिक, चांदोरी येथील सरदार हिंगणे यांचा कृष्ण जन्माची परंपरा समान आहे. नाशिक येथील मुरलीधर मंदिरातील कृष्णाची मूर्र्ती ही मूळची चांदोरी येथील सरदार हिंगणे यांची असून, ती नाशिक येथे नेल्याने सर्वश्रुत आहे. त्यानंतर हिंगणे यांनी त्या मूर्र्तीसारखीच मूर्ती जयपूर राज्यस्थान येथून बनवून आणल्यानंतर प्रतिष्ठापना केली. कृष्ण जन्माष्टमीनिमित्त वर्षानुवर्षे विविध कार्यक्रम पार पडले जात होते, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कार्यक्रमास खंड पडला तरी कृष्णजन्म मोजक्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये पार पडला.

Web Title: Virjan on the excitement of curd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.