नाशिकच्या विनेश नायर याने केले सलग २४ तास ड्रमवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2018 12:50 PM2018-01-30T12:50:02+5:302018-01-30T12:50:10+5:30
नाशिक : ‘ए दिल है मुश्किल’, ‘तेरी दिवानी दिवानी’ अशा हिंदी मराठी गीतांवर ‘एम एच १५’ बॅँड पथकातील ड्रमवादक विनेश नायर यांनी ड्रमवादन करीत रसिकांना मंत्रमुग्ध केले. अखंड २४ तास ड्रमवादनाचा विक्रम प्रस्थापित केला असून, रसिक श्रोत्यांनी त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सिटी सेंटर मॉलच्या दुसºया मजल्यावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.२७) दुपारी या उपक्रमास प्रारंभ झाला. ‘स्वयंम क्रिती फाउंडेशन’ या सामाजिक संस्थेद्वारे आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी निधी गोळा करणे हा यामागचा उद्देश होता. या विक्रमात त्यांना ३५० हून अधिक विद्यार्थ्यांचे प्रोत्साहन लाभले. या विद्यार्थ्यांनी एक एक करून त्यांच्याबरोबर ड्रमवादन केले. नायर यांनी यावेळी हिंदी मराठी पारंपरिक गिते, पाश्चात्य गीतेही सादर केली. यावेळी त्यांनी ‘एमएच१५’ या बॅँड पथकाची ओळख असणाºया गाण्यांसह विविध गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली. वीकेण्डमुळे मॉलमध्ये येणारे नागरिक तसेच युवा वर्ग यांचा या उपक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यापुढे आणखी नवे विक्रम करण्याचा मनोदय यावेळी विनेश यांनी बोलून दाखविला.