ग्रामीणमध्ये विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 12:40 AM2017-08-14T00:40:49+5:302017-08-14T00:44:28+5:30

नाशिक : जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी यंदा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाणे, विभागीय तसेच जिल्हास्तरीय विघ्नहर्ता बक्षीस योजना सुरू केली जाणार आहे़या बक्षीस योजनेद्वारे नियमांचे पालन करणाºया तसेच बक्षीस योजनेचे निकष पूर्ण करणाºया मंडळांना रोख स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार असून,गणेश मंडळांनी डिजेमुक्त गणेशोत्सव करण्याचे आवाहन दराडे यांनी केले आहे़

Vishnharta Ganeshotsav Award Scheme in Rural | ग्रामीणमध्ये विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना

ग्रामीणमध्ये विघ्नहर्ता गणेशोत्सव बक्षीस योजना

Next

नाशिक : जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळांसाठी यंदा ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या संकल्पनेतून पोलीस ठाणे, विभागीय तसेच जिल्हास्तरीय विघ्नहर्ता बक्षीस योजना सुरू केली जाणार आहे़या बक्षीस योजनेद्वारे नियमांचे पालन करणाºया तसेच बक्षीस योजनेचे निकष पूर्ण करणाºया मंडळांना रोख स्वरूपाची बक्षिसे दिली जाणार असून,गणेश मंडळांनी डिजेमुक्त गणेशोत्सव करण्याचे आवाहन दराडे यांनी केले आहे़ गणेशोत्सव मंडळाच्या परीक्षणासाठी समिती गठीत केल्या जाणार असून, त्यामध्ये विभागीय स्तरावर उपविभागीय अधिकारी, पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी तसेच त्या क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ता, डॉक्टर, प्राध्यापक, शिक्षक, पत्रकार, अल्पसंख्याक सदस्य, प्रतिष्ठित व्यक्ती यांचा समावेश असणार आहे़ गणेशोत्सवात मंडळांची प्रत्यक्ष पाहणी करून सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, राष्ट्रीय एकात्मतेचे संदेश देणारे देखावे व उपक्रमांसाठी गुण देणार आहेत़या समितीने आपला अहवाल जिल्हा समितीला सादर केल्यानंतर जिल्हा परीषण समितीतील अपर पोलीस अधीक्षक व त्यांचे सहकारी जिल्ह्णातील पाच उत्कृष्ट गणेश मंडळांची आदर्श मंडळ म्हणून निवड करतील़ यामध्ये प्रथम तीन व उत्तेजनार्थ दोन अशा बक्षिसांचा समावेश आहे़ या स्पर्धेसाठी मंडळांना संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये नोंदणी करणे बंधनकारक आहे़ गणेशोत्सव शांततेत साजरा करण्यासाठी मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिट्या, पोलीसमित्र, प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठका सुरू असून, ‘एक गाव एक गणपती’साठी प्रोत्साहन दिले जात आहे़ श्रीगणेश मंडळांनी वाहतुकीला अडथळे निर्माण होणार नाहीत अशी मंडप उभारणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत़

मंडळांसाठी गुणांकनाचे दहा निकष़़

मंडळांनी सर्व परवानग्या घेतल्या आहेत काय.
स्टेज, प्रकाशयोजना, स्वतंत्र वीज व्यवस्था.
मंडपाचा रहदारीस अडथळा.
सादर केलेले देखावे व त्यांचा दर्जा.
पोलिसांच्या अटी व नियमांचे पालन.
श्रींच्या मूर्ती संरक्षणाची तरतूद
गर्दी नियंत्रण, दर्शन रांग व्यवस्था.
सुरक्षेसाठी केलेली उपायोजना,
यंत्रणा.
पर्यावरण जागृतीचे संदेश.
ध्वनी प्रदूषण अटींचे पालन, वेळेचे पालन.

Web Title: Vishnharta Ganeshotsav Award Scheme in Rural

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.