ओझरला माहेश्वरी महिला मंडळतर्फे विष्णूयाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2020 01:05 IST2020-10-13T23:37:40+5:302020-10-14T01:05:54+5:30
ओझर:येथील माहेश्वरी प्रगती महिला मंडळच्या वतीने अधिकमसानिमित्त अधिकमसानिमित्त विष्णू पूजन,तुलसी अर्चन,विष्णू याग व गोदान येथे बालाजी मंदिरात संपन्न झाले.यावेळी महापूजेची सुरवात गणपती पूजनाने झाली.

माहेश्वरी प्रगती महिला मंडळ यांचे वतीने गोदान करताना सर्व यजमान.
ओझर:येथील माहेश्वरी प्रगती महिला मंडळच्या वतीने अधिकमसानिमित्त अधिकमसानिमित्त विष्णू पूजन,तुलसी अर्चन,विष्णू याग व गोदान येथे बालाजी मंदिरात संपन्न झाले.यावेळी महापूजेची सुरवात गणपती पूजनाने झाली. त्यानंतर सवर्पाप निवारण विष्णू देवता कृपा प्राप्ती साठी वेदमूर्ती योगेश जोशी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी उपस्थित याजमान यांचे कडून वेदशास्त्र संपन्न पूजा करून घेतली. यावेळी रामेश्वर ब्यास,विनोद चांडक,गोपाल पांडे,ताराचंद ब्यास,मदन ब्यास,संजय सारडा,योगेश जाजू,सुभाष शर्मा,सुदर्शन सारडा हे सपत्नीक सहभागी झाले होते.तसेच निमर्ला लद्दड,शोभा जाजू,शकुंतला ब्यास ब्यास,कल्पना लद्धा,मंगला लद्धा या देखील पूजेत सहभागी झाले.यावेळी मंडळाच्या अध्यक्षा जयकांता लद्धा,मंजुषा ब्यास,श्रद्धा ब्यास,हर्षा ब्यास हे उपस्थित होते.श्रीनिवास कुलकर्णी व सीमा कुलकर्णी या दाम्पत्यास गाईची पूजा करत गोदान करण्यात आले.यावेळी माहेश्वरी प्रगती महिला मंडळ व माहेश्वरी समाजाचे सदस्य उपस्थित होते.