विश्रामगड, बितनगड, आड किल्ल्यावर दुर्गपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2021 04:13 AM2021-03-07T04:13:40+5:302021-03-07T04:13:40+5:30
यावेळी जनसेवा मंडळाचे रामदास भोर, रवींद्र भोर, आदित्य कचरे, कृष्णा भोर, दुर्गप्रेमी अंकुर काळे, हौशीराम गोडे, राजू गोडे, भैरव ...
यावेळी जनसेवा मंडळाचे रामदास भोर, रवींद्र भोर, आदित्य कचरे, कृष्णा भोर, दुर्गप्रेमी अंकुर काळे, हौशीराम गोडे, राजू गोडे, भैरव गोडे, विश्वास गोडे, मारुती धादवड, सचिन गोडे, किसन गोडे, गुरूनाथ भांगरे यांच्यासह आशीर्वाद प्रतिष्ठान, शेवगावचे अशोक कचरे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी गणेश शिंदे, शंकर आमले, भरत गुंड व सागर भोर आदींनी प्रयत्न केले.
------------------------
२६ वर्षांपासून परंपरा
‘शिवाजी ट्रेल’ या संस्थेतर्फे गेल्या २६ वर्षांपासून गडकिल्ल्यांवर दुर्गपूजन करण्यात येते. पुणे जिल्ह्यातील दहा किल्ल्यांवर पूजनाने या उपक्रमाला सरुवात करण्यात आली होती. विश्रामगड परिसरातील बितनगडावर वनअधीक्षक गोंदके, राजाराम बेंडकोळी व योजना बेंडकोळी यांच्या हस्ते दुर्गपूजन करण्यात आले. यावेळी वनपाल चव्हाण, वनरक्षक शंकर बेनके, पंढरी पेढेकर, भोरू पेढेकर, विठ्ठल पेढेकर, प्रभाकर भांगरे, काळू पेढेकर आदी उपस्थित होते.
---------------
आडकिल्ल्याच्या पायथ्याशी कार्यक्रम
सिन्नर तालुक्यातील आडवाटेवरील आडकिल्ल्याच्या पायथ्याशीदेखील दुर्गपूजन करून दुर्गाप्रति आदर व्यक्त करण्यात आला. उपसरपंच अनिता बिन्नर यांच्या हस्ते आडकिल्ल्याच्या पायथ्याचे पूजन केले गेले. यावेळी राजाराम बिन्नर, सुनील बिन्नर, भास्कर बिन्नर, सुरेश बिन्नर, पाटीलबा बिन्नर, कारभारी बिन्नर, किसन बिन्नर, विजय बिन्नर, सचिन बिन्नर, दत्तू बिन्नर व शरद बिन्नर आदी उपस्थित होते.
------
नाशिक व नगर जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या विश्रामगडावर जनसेवा मंडळाच्या वतीने सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले. (०६ सिन्नर २)
===Photopath===
060321\06nsk_17_06032021_13.jpg
===Caption===
०६ सिन्नर २