विश्रामगड, ढग्या डोंगराच्या पायथ्याशी चार हजार बियांचे रोपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 06:20 PM2020-06-25T18:20:08+5:302020-06-25T18:21:31+5:30
सिन्नर : येथील दोन पर्यावरणस्नेही तरु ण शिक्षिकांनी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी भैरवनाथ तळ्याच्या परिसरात सुमारे 3500 तर विश्रामगडाच्या पायथ्याशी 500 अशा चार हजार बियांची लागवड करण्यात आली.
सिन्नर : येथील दोन पर्यावरणस्नेही तरु ण शिक्षिकांनी ढग्या डोंगराच्या पायथ्याशी भैरवनाथ तळ्याच्या परिसरात सुमारे 3500 तर विश्रामगडाच्या पायथ्याशी 500 अशा चार हजार बियांची लागवड करण्यात आली.
काटेरी वनस्पतींच्या मुळाशी बारमाही आर्द्रता असते. त्यामुळे या झाडांच्या मुळाशी बीजारोपण केल्यास त्यांची कमी पाण्यात वाढ होते. काटेरी कुंपणामुळे जनावरांपासूनही रोपांचे संरक्षण, संगोपन होवून झाडांची लवकर वाढ होते, ही बाब हेरु न बारागाव पिंप्री महाविद्यालयातील प्राध्यापिका मंगल सांगळे आण िगुळवंच जिल्हा परिषदेच्या शाळेच्या शिक्षिका मनीषा उगले या पर्यावरणप्रेमी मैत्रिणींनी हा उपक्र म हाती घेतला आहे.
प्रा. सांगळे व उगले या दोघींनी फेब्रुवारी, मार्चमध्ये आपल्या विद्यार्थ्यांच्या मदतीने जवळपास 5 हजाराहून अधिक बिया जमवल्या. मुख्यत: सावली देणाया आण िकमी पाण्यात तग धरणार्?या कडुनिंब, चिंच, बहावा, बीट्टी आण किांचन या बियांचा त्यात समावेश आहे. गेले आठवडाभर ढग्या डोंगराच्या पायथ्याशी, तळ्यातील भैरवनाथाच्या परिसरात काटेरी वनस्पतींच्या मुळाशी साडेतीन हजारांहून अधिक बिया रु जविल्या गेल्या. विश्राम गडावर जात तेथेही 500 बियांची लागवड करण्यात आली. सिन्नर शहर परिसरातील ओसाड टेकड्यांवर यापुढे अधिकाधिक बीजलागवड करण्याचा आमचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.