कळवण, रामनगर येथे विश्वकर्मा जयंती
By admin | Published: February 12, 2017 12:00 AM2017-02-12T00:00:56+5:302017-02-12T00:01:12+5:30
शहरात मिरवणूक : मान्यवरांच्या उपस्थितीत विश्वकर्मा मंदिराचे भूमिपूजन
कळवण : विश्वकर्मा जयंती कळवण शहर व तालुक्यात उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीनिमित्ताने कळवण शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात येऊन रामनगर येथे मिरवणुकीचा समारोप करण्यात येऊन विश्वकर्मा मंदिराचे भूमिपूजन मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. पुढे बोलताना जाधोर म्हणाले की, विश्वकर्मा महाराजांचा आदर्श युवकांनी डोळ्यासमोर ठेवून सामाजिक कार्य करावे आणि समाजबांधवांसमोर एक वेगळा आदर्श ठेवावा व मंदिर पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व घटकांनी प्रयत्न करावे, असे आवाहन जाधोर यांनी केले. याप्रसंगी कळवण पत्रकार संघाचे अध्यक्ष रवींद्र बोरसे, अशोक शिंदे, आनंद पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जैन, रवींद्र पगार, जयंती समितीचे अध्यक्ष गोरख जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरीक्षक सुजय घाटगे, उपनिरीक्षक गोसावी, कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता पगार, उपनगराध्यक्ष अनिता जैन, नगरसेवक साहेबराव पगार, आरोग्य सभापती अतुल पगार, बांधकाम सभापती जयेश पगार, महिला बालकल्याण सभापती भाग्यश्री पगार, नगरसेवक बाळासाहेब जाधव, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष जितेंद्र पगार, नगरसेवक मनोज देवरे, उद्योगपती दुर्वास कोठावदे, गोरख बोरसे, शांताराम कोठावदे, रमेश जाधव, दिगंबर निकुंभ, फकिरा हिरे, बाबूराव कुवर, भीमराव शिंदे, प्रा. किशोर पगार, भगवान जाधव, अशोक शिंदे, विष्णू गवळी, दावल सूर्यवंशी, रमेश खैरनार, संदीप बोरसे, अमर आहिरे, संजय जगताप, संजय जाधव, रोहन जाधव, प्रशांत शिंदे, नंदू कुवर, डॉ. किशोर कुवर, नाना खैरनार, राजेंद्र खैरनार, भिकन शिंदे, राजेंद्र सोमवंशी, आदिंसह समाजबांधव व महिला समितीचे सदस्य उपस्थित होते. यावेळी मंदिराच्या जागेचे भूमिपूजन गटनेते कौतिक पगार व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. जयंती मिरवणूक कळवण शहर व रामनगर येथे काढण्यात आली. सूत्रसंचालन किशोर पगार, तर आभार गोरख जाधव यांनी मानले.
(वार्ताहर)