व्हिजन अकॅडमीचे स्नेहसंमेलन रंगले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2019 12:18 AM2019-12-29T00:18:58+5:302019-12-29T00:19:17+5:30
नाशिकरोड जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, व्हिजन किड्स व व्हिजन अॅक्टिविटी हब यांचा संयुक्त स्नेहसंमेलन उत्साहात पार ...
नाशिकरोड जेलरोड येथील व्हिजन अकॅडमी इंग्लिश मीडियम स्कूल, व्हिजन किड्स व व्हिजन अॅक्टिविटी हब यांचा
संयुक्त स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक प्रशांत दिवे, मंगला आढाव, शेतकरी रुक्मिणीबाई आढाव, मंदाकिनी मुदलीयार, बालाजी सोशल फाउंडेशनचे संस्थापक कैलास मुदलियार, उपाध्यक्ष गिरीश मुदलियार, सचिव सतीश
मस्के आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले. पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्ष अॅड. अंकिता मुदलियार यांनी केला. स्नेहसंमेलनात व्हिजन किड्सच्या विद्यार्थ्यांनी बॉलिवूड मसाला या संकल्पनेतून सध्याच्या चित्रपटातील नवोदित कलाकारांच्या गाण्यांवर नृत्य केले. व्हिजन अॅक्टिव्हिटी हबच्या विद्यार्थ्यांनी मुली व महिला यांनी स्वसंरक्षणासाठी तत्पर राहावे व संकटाचा सामना करावा यावरील प्रात्यक्षिके सादर केली, तर शिक्षकांनी मोबाइल फोनचे फायदे व नुकसान यावर नाटिका सादर केली. व्हिजन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी देशातील नामवंत व्यक्ती, नेते, शास्त्रज्ञ आदींच्या कर्तृत्वाला उजाळा दिला.
महात्मा गांधी, महानायक अमिताभ बच्चन, दक्षिणेतील अभिनेता रजनीकांत, सिनेअभिनेत्री माधुरी दीक्षित, मराठी चित्रपटसृष्टीचे महानायक दादा कोंडके, शाहरूख खान यांच्या गाजलेल्या गाण्यांवर मुलांनी कलाविष्कार सादर केले. तसेच आंतरराष्ट्रीय धावपटू मिल्खा सिंग, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, संगीतकार ऐ. आर. रहेमान, दिवंगत लोकप्रिय गायक आर. डी. बर्मन, किशोरकुमार, थोर शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीवीर भगतसिंग, शांतीदूत मदर तेरेसा, जागतिक पॉप सिंगर मायकल जॅक्शन, प्रभुदेवा आदींच्या कर्तृत्वाला उजाळा दिला. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनीथा थॉमस, प्रिया आठवले यांनी केले. सूत्रसंचालन दीपाली भट्टड, अनिता जगताप, सुवर्णा झलके यांनी केले. यावेळी विद्यार्थी, पालक, शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.