एस टी कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकतेचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 01:14 IST2021-07-21T23:05:18+5:302021-07-22T01:14:11+5:30
लासलगाव : औरंगाबादहुन नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी एस टी बसने प्रवास करताना येवला येथे एका महिलेचे सोन्याची पोत,अंगठी व इतर सामान असलेली पिशवी बसमध्येच राहुन गेली. यावेळी कर्तव्यार्थ असलेले वाहक जी. डी. साळवे व चालक ए.आर. शिंदे यांच्या प्रामाणिक पणामुळे प्रवाशी महिलेस सदर मौल्यावान वस्तूंसह पिशवी परत मिळाल्याने सदर महिलेने समाधान व्क्त केले आहे.

प्रवासादरम्यान बसमध्ये राहिलेली सोन्याची पोत व अंगठी असलेली सामानाची पिशवी प्रवाशी महिलेस परत करताना जी. डी. साळवे, ए. बी. उखार्डे आदी.
लासलगाव : औरंगाबादहुन नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी एस टी बसने प्रवास करताना येवला येथे एका महिलेचे सोन्याची पोत,अंगठी व इतर सामान असलेली पिशवी बसमध्येच राहुन गेली. यावेळी कर्तव्यार्थ असलेले वाहक जी. डी. साळवे व चालक ए.आर. शिंदे यांच्या प्रामाणिक पणामुळे प्रवाशी महिलेस सदर मौल्यावान वस्तूंसह पिशवी परत मिळाल्याने सदर महिलेने समाधान व्क्त केले आहे.
सोमवारी (दि.१९) लासलगाव आगाराच्या (एम एच १४ बीटी ९३२७) या बसने औरंगाबाद ते नाशिक गाडीने कमल जगदाळे (८०) या नाशिक येथे मुलीकडे येण्यासाठी प्रवास करत असताना येवला बसस्थानकावर लघुशंकेसाठी चालक -वाहकाला न सांगताच उतरल्या व अनावधानाने बस बदली झाल्याने त्यांचे एक तोळ्याची सोन्याची पोत, ५ ग्रॅमची अंगठी व इतर सामानाची पिशवी बसमध्येच राहुन गेली.
सदर बाब लासलगाव आगाराचे चालक अण्णा शिंदे व वाहक गुलाब शिंदे यांच्या लक्षात आल्याने व बसमध्ये एक पिशवी दिसल्याने चौकशी केली. परंतु काही प्रतिसाद न मिळाल्याने ती पिशवी लासलगाव आगारात जमा करुन सदर प्रवाशी महिलेस दागिने परत करुन आपल्या प्रामाणिकतेचे दर्शन घडविल्याने त्यांचे कौतुक होत आहे.
अतिशय तुटपुंज्या पगारामध्ये काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाची अनेक उदाहरणे आजतागायत ऐकायला मिळत आहे, कोणतीही लालसा मनात न ठेवता बसचे चालक-वाहक सेवा बजावत आहेत. असाच प्रामाणिकपणा दाखविणारे वाहक जी. डी. साळवे व चालक ए. आर. शिंदे यांचे आगार व्यवस्थापक एस. एन. शेळके, वाहतुक नियंत्रक ए. बी. उखार्डे, एन. एल. बोठे, वाय. आर. क्षिरसागर, एस. टी. कदम, बी. के. वाकचौरे, एस. के. तडवी आदिंनी कौतुक केले.