नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत!

By अझहर शेख | Published: September 9, 2022 06:58 PM2022-09-09T18:58:01+5:302022-09-09T18:59:47+5:30

अजानचा आवाज कानी येताच नाशिकमधील सर्वात जुने शिवसेवा युवक मित्र मंडळाने ढोलताशांचे वादन थांबविले.

vision of hindu muslim unity in bappa procession the azan begins the sound of the drummers is quiet | नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत!

नाशिक: हम सब एक हैं; बाप्पाच्या मिरवणुकीत हिंदु-मुस्लीम ऐक्याचे दर्शन; अजान सुरु होताच ढोलताशांच्या आवाज शांत!

Next

नाशिक : शुक्रवार (दि.९) अनंत चतुर्दशी अन 'जुम्मा'चा दुग्धशर्करा योग जुळून आला. सकाळी अकरा वाजता 23 सार्वजनिक गणेश मंडळांची पारंपरिक मुख्य विसर्जन मिरवणुक मोठ्या ढोल-ताशांच्या गजरात सुरू झाली. हळूहळू मंडळ मिरवणुकीत पुढे सरकत असताना दुपारी पाऊण वाजेची अजान येथील मशिदींमधून सुरू झाली. अजानचा आवाज कानी येताच नाशिकमधील सर्वात जुने शिवसेवा युवक मित्र मंडळाने ढोलताशांचे वादन थांबविले. एक ते दीड मिनिटे सर्व वादक स्तब्ध उभे राहिले. अजान आटोपताच पुन्हा बाप्पांच्या निरोपासाठीचा ढोलताशांचा आवाज निनादू लागला.

नाशिक हे ऐतिहासिक, सांस्कृतिक व धार्मिक शहर म्हणून सर्वदूर प्रसिद्ध आहे या शहराने नेहमीच जातीय सलोखा आणि हिंदू मुस्लिम ऐक्य पारंपारिक प्रथांमधून जपले आहे गणेशोत्सव असो किंवा असो ईद व दिवाळी होळी सर्वच सण हिंदू मुस्लिम गुन्ह्यागोविंदाने एकत्र येऊन साजरे करतात दोन वर्षांपूर्वी 2019 साली देखील अशाच प्रकारे या विसर्जन मिरवणुकीत जातीय सलोख्याचे दर्शन घडले होते तेव्हाही गणेश मंडळांनी आजांचा आदर करत दीड मिनिटांसाठी ढोल वादन थांबविले होते.विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे मिरवणूकिला मुस्लिम बहुल भागातूनच प्रारंभ केला जातो. वर्षानुवर्ष ही परंपरा कायम आहे. जुने नाशिक हा गावठाण परिसर येथील जहांगीर मशीद अर्थात वाकडीबारव (चौक मंडई) हा सर्वच मिरवणुकांचा 'स्टार्ट पॉइंट' येथूनच सर्व धर्मीयांच्या मिरवणुकांना सुरुवात होते. मग तो ईद-ए-मिलादचा जुलूस  असो किंवा गणेश विसर्जन मिरवणूक असो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची मिरवणूक असो अथवा छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्ताने निघणारी मिरवणूक असो अशा सर्वच मिरवणुका येथूनच सुरू होतात.

कोरोनाच्या लाटेमुळे दोन वर्ष अशा प्रकारच्या मिरवणुकांना खंड पडला मिरवणुकांचे निमित्त जरी असले तरी या निमित्ताने धार्मिक सामाजिक सलोखा एकोपा हा वृद्धिंगत होत असतो हाच तर सण उत्सवन मागील महत्त्वाचा उद्देश आहे या निमित्ताने सर्वजण एकत्र येतात आणि सामाजिक बंधुत्व वाढत जाते नाशिक शहराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे शुक्रवारी निघालेल्या गणराय यांच्या विसर्जन मिरवणुकीत देखील याचे दर्शन घडले शुक्रवार म्हटला की मुस्लिम धर्मियांची एक प्रकारची साप्ताहिक ईदच असते या दिवशी दुपारची अजान सव्वा ऐवजी पाहून वाचताच पुकारले जाते कारण मशिदींमध्ये एक वाजेपासून ते दीड वाजेपर्यंत धर्मगुरूंची प्रवचन चालते आणि त्यानंतर मुख्य नमाजला सुरुवात होते त्यामुळे अन्य दिवसांच्या तुलनेत अर्धा तास अगोदर अजान मशिदींमधून पुकारली जाते. 

आज अनंत चतुर्दशीला बाप्पा निरोप देत असताना गणेशभक्तांनी मोठ्या उत्साहात काढलेल्या मिरवणुकीत ढोल ताशांचा गजर चौफेर घुमत होता याचवेळी पाऊण वाजता मिरवणूक मार्गावरील जहांगीर मशीद, हेलबावडी मशिद, शाही मशीद कोकणीपुरा मशिदीतून अजान सुरू झाली. मंडळाच्या कानावर हा आवाज पडला आणि मग काय सामाजिक बांधिलकी म्हणून मंडळांनी ढोल ताशांचा वादन थांबविण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पुढाकार घेतला शिवसेना युवक मित्र मंडळाने शिवसेवा युवक मंडळ हे जुने मंडळ असून गाडगे महाराज पुतळा येथे या मंडळाकडून गणरायाची प्रतिष्ठापना मोठ्या भक्ती भावाने केली जाते या मंडळाच्या ढोल वादन पथकाने ढोल ताशांचा आवाज थांबविला यामुळे अन्य मंडळांनी देखील त्यांचा कडून प्रेरणा घेत एक मिनिटांसाठी ढोल वादन थांबविले आणि अशा प्रकारे श्री गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत धार्मिक व जातीय सलोख्याचे अनोखे दर्शन घडले.

Web Title: vision of hindu muslim unity in bappa procession the azan begins the sound of the drummers is quiet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक