कांचनेत बिबट्याचे दर्शन; घबराट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2020 12:23 AM2020-03-08T00:23:22+5:302020-03-08T00:24:20+5:30
खर्डे : परिसरातील पश्चिम भागातील अतिदुर्गम अशा कांचने गावात (कांचनेबारी) रविवारी रात्री दोन बिबटे दिसल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण े आहे . वन विभागाने याची दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा बसवावा, अशी मागणी कांचनेसह ,कणकापूर , शेरी , खर्डे येथील नागरिकांनी केली आहे .

याठिकाणी गेल्या अनेक दिवसांपासून या बिबट्यांच्या संचार वाढला असून , नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे . कांचनेबारी मार्गावरून वाहतूक वाढली आहे . या मार्गावरून रात्री अपरात्री जा- ये करणाऱ्या वाहनधारकांना बिबटे दिसल्याची चर्चा आहे . भीतीपोटी रात्री या मार्गावरून जाण्याचे धाडस वाहनधारक करीत नाहीत .कांचने व परिसरात दिवसा वीजपुरवठा नसल्याने येथील शेतकरी बिबट्याच्या भीतीने रात्री पिकांना पाणी भरण्यासाठी देखील जात नसल्याची माहिती मिळाली आहे. पिकांना पाणी देता येत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होते आहे. तरी वन विभागाने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी पिंजरा बसवून, नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे .
दरम्यान , या परिसरात बिबट्याने गाय , वासरू फस्त केल्याची घटना घडली आहे . यामुळे पशुपालकांनी नाराजी व्यक्त केली आहे .