अमेरिकन शिष्टमंडळाची रुग्णालयाला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2018 01:48 AM2018-04-01T01:48:19+5:302018-04-01T01:48:19+5:30
अमेरिकन आंतरराष्टय शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. महाराष्टÑ सरकारने कॅन्सर रुग्णांसाठी व उपचारासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून ही भेट असून, कॅन्सरच्या रुग्णांच्या तपासणीसाठी आधुनिक सुविधांसह मोबाइल कॅन्सर व्हॅन देण्याचे या शिष्टमंडळाने कबूल केले आहे.
नाशिक : अमेरिकन आंतरराष्टय शिष्टमंडळाने शुक्रवारी जिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालयाला भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. महाराष्टÑ सरकारने कॅन्सर रुग्णांसाठी व उपचारासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचा भाग म्हणून ही भेट असून, कॅन्सरच्या रुग्णांच्या तपासणीसाठी आधुनिक सुविधांसह मोबाइल कॅन्सर व्हॅन देण्याचे या शिष्टमंडळाने कबूल केले आहे. या शिष्टमंडळात अमेरिकेतून रॅड एड या आंतरराष्टय प्रकल्प समन्वयक आॅलिव्ह पीअर्स, ब्रेस्ट रेडिओलॉजिस्ट लिना ग्रोवर, रेडिओलॉजिस्ट डॉ. इसली अॅमिंडर, मेमोग्राफी टेक्निशियन गाइल्ड सीस यांचा समावेश होता. यावेळी त्यांनी रुग्णालयातील इतर उपचार व सुविधा यांचीही माहिती घेतली. या शासकीय रुग्णालयांमधून गोर गरिबांना कॅन्सर संदर्भात आधुनिक सुविधा मिळण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव तयार केला व रेड एड संस्थेमार्फत नाशिक जिल्ह्यासाठी या सुविधा देण्याचे मत प्रदर्शित केले. या पाहणी दरम्यान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी सुशील वाकचौरे, अतिरिक्तजिल्हा शल्य चिकित्सक गजानन होले, निवासी वैद्यकीय अधिकारी अनंत पवार, संदर्भ सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक प्रल्हाद गुठे, विशेष कार्यअधिकारी डॉ. नामपल्ली, रेडिओलॉजी विभागाचे प्रमुख मंगेश थेटे, फिजिशियन डॉ. प्रमोद गुंजाळ, रेडिओलॉजिस्ट कल्पना व्यवहारे, स्त्रीरोगतज्ज्ञ शलाका कवडे, अधिसेविका मानीनी देशमुख, परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयाचे प्राचार्य राजन इनामदार, डॉ. भूषण पाटील, डॉ. स्वप्नील जगदाळे, डॉ. राहुल विधाते, डॉ. शिल्पा बांगर, श्रीमती विद्या जोशी उपस्थित होते.