छगन भुजबळ यांच्याकडून सकाळी ग्रंथविक्री प्रदर्शनास भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 11:16 IST2021-12-05T11:15:46+5:302021-12-05T11:16:00+5:30
भुजबळ यांनी काही स्टॉलवर भेट देत पुस्तकांचे बारकाईने निरीक्षण केले.

छगन भुजबळ यांच्याकडून सकाळी ग्रंथविक्री प्रदर्शनास भेट
नाशिक: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या शेवटच्या दिवशी स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी सकाळीच भेट दिली.
भुजबळ यांनी काही स्टॉलवर भेट देत पुस्तकांचे बारकाईने निरीक्षण केले. त्यानंतर माजी खासदार समीर भुजबळ यांनी भेट देऊन पाहणी केली. अतिशय सकाळीच भुजबळ संमेलन स्थळी दाखल झाले होते.
शरद पवार यांचे आगमन
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे साडेदहा वाजेच्या सुमारास कुसुमाग्रजनगरीत आगमन झाले. भुजबळ यांच्या सोबत छोट्या गाडीत बसून त्यांनी संमेलनास फेरफटका मारला. सकाळी स्वच्छ ऊन पडल्याने आयोजकांसह नागरिकांनी समाधान व्यक्त केले.