श्रीकृष्ण ज्ञानमंदिर ट्रस्टच्या वतीने दिवाळी भेट
By admin | Published: October 29, 2016 12:25 AM2016-10-29T00:25:27+5:302016-10-29T00:25:50+5:30
श्रीकृष्ण ज्ञानमंदिर ट्रस्टच्या वतीने दिवाळी भेट
येवला : तालुक्यातील अंगणगाव येथील महानुभाव पंथाचे श्रद्धास्थान असलेले श्रीकृष्ण ज्ञानमंदिर ट्रस्टच्या वतीने नायगव्हाण येथील गरजू, गरीब कुटुंबीयांची भेट घेत सामाजिक बांधिलकी जपत त्यांना दिवाळीचा फराळ, नित्योपयोगी वस्तू तसेच महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. श्रीकृष्ण ज्ञानमंदिराचे महंत दत्ताराज बाबा पालीकर व तपस्वी ज्योतीताई अंकुळनेकर यांच्या संकल्पनेतून येवला, सुरगाणा, अंबड, नांदेड आदि तालुक्यातील खेड्यांमधील गरजू व गरीब कुटुंबीयांना समक्ष भेट देऊन महागाईच्या जमान्यात कोणतेही गरीब कुटुंब दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहू नये, त्यांचीही दिवाळी आनंदात साजरी व्हावी, या उद्देशाने त्यांना दिवाळीचा फराळ, कपडे, किराणा वस्तू, आकाश कंदिलाचे वाटप करण्यात आले.
सुरगाणा येथील अंध व अपंग विद्यार्थी मनोहर महाले यास ट्रस्टचे अध्यक्ष पालीकर यांनी दत्तक घेत त्यांच्या भविष्यातील शिक्षणाच्या खर्चाची जबाबदारी उचलली आहे. उपक्रम यशस्वीततेसाठी संजय गणोरे, बाळासाहेब पारखे, मच्छिंद्र ठोंबरे, मनोज गाडेकर, सुमित गायकवाड, पंकज सदगीर, माणिक शेजवळ, देवीदास गायकवाड, शुभम पालीकर, बापू भोजणे, आदेश काळे, बापू देवकर, सोमनाथ बोराडे आदिंचे सहकार्य लाभले. (वार्ताहर)