मोह शाळेस ई-लर्निंग साहित्य भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2018 07:00 PM2018-11-05T19:00:57+5:302018-11-05T19:01:21+5:30

सिन्नर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोह यांच्याकडून चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीस ई-लर्निंग साहित्य भेट देण्यात आले.

Visit the E-learning material to Moh school | मोह शाळेस ई-लर्निंग साहित्य भेट

सिन्नर तालुक्यातील मोह येथील जिल्हा परिषद शाळेस ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ई-लर्निंग साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याप्रसंगी सरपंच सुदाम शिंदे, अ‍ॅड. गोपालदास मेहता, संजय फडोळ, योगेश टिळे आदी.

Next

वडझिरे : सिन्नर तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोह यांच्याकडून चौदाव्या वित्त आयोगातून जिल्हा परिषद शाळा व अंगणवाडीस ई-लर्निंग साहित्य भेट देण्यात आले.
१४व्या वित्त आयोग व आमचा गाव आमचा विकास योजनेतून जिल्हा परिषद शाळेस ४३ इंच टीव्ही, साउण्ड सिस्टीम, प्रथमोपचार पेटी, सर्व खेळांचे खेळ साहित्य, पूरक अध्ययन खेळ साहित्य तसेच मोह अंगणवाडी व होलगीर वस्ती अंगणवाडीसाठी प्रथमोपचार पेटी, खेळ साहित्य, खेळाचे साहित्य असे सुमारे एक लाख ४२ हजार रुपयांचे साहित्य वाटप करण्यात आले. अ‍ॅड. गोपाल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात ह्यूमन राइट्स फोरम नाशिकचे वांद्रे, गटशिक्षणाधिकारी शिवनाथ निर्मळ, संजय फडोळ, योगेश टिळे, सरपंच सुदाम बोडके, अध्यक्ष पंढरीनाथ भिसे, उपसरपंच साहेबराव बिन्नर आदी उपस्थित होते.
वांद्रे व फडोल यांनी शाळेसाठी पंखा तर सपना मेहेकर, सुदाम मेहेकर यांनी शाळेसाठी घड्याळ भेट दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य नामदेव भिसे, संदीप बोडके, सोमनाथ बोडके, मनोज साळवे, चंद्रभान बोडके, मनसेचे गटनेते धनाजी बोडके, शरद बोडके, माजी सरपंच निवृत्ती होलगीर, पोलीसपाटील भाऊराव बिन्नर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक पगार यांच्यासह शिक्षकांनी परिश्रम घेतले. संदीप गिते यांनी सूत्रसंचालन केले.
 शाळेच्या गरजा भागविण्यासाठी कटिबद्ध
शाळेच्या भविष्यातील सर्व गरजा भागविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. तसेच यापुढेही अशीच मदत विद्यार्थी हितासाठी करणार असल्याचे आश्वासन सरपंच सुदाम बोडके यांनी दिले. गटशिक्षणाधिकारी निर्मळ यांनी लोहसहभागातून शाळेस दर्जेदार साहित्य दिल्याबद्दल ग्रामपंचायतीचे आभार मानले. या साहित्याचा उपयोग विद्यार्थी घडविण्यासाठी, आनंददायी शिक्षण होण्यासाठी व्हावा यासाठी त्यांनी शिक्षकांना सुचित केले.
 

 

Web Title: Visit the E-learning material to Moh school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.