ग्रामस्वच्छता अभियान कमिटीची जानोरी येथे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 05:43 PM2019-05-14T17:43:32+5:302019-05-14T17:43:47+5:30
दिंडोरी: केंद्र सरकारच्या दिल्ली येथील केंद्रीय जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियान पाहणी कमिटीने आज दिंडोरी तालुक्यातील जानोरी लोखंडेवाडी या गावांना भेटी दिल्या
दिंडोरी: केंद्र सरकारच्या दिल्ली येथील केंद्रीय जिल्हास्तरीय ग्रामस्वच्छता अभियान पाहणी कमिटीने आज दिंडोरी तालुक्यातील जानोरी लोखंडेवाडी या गावांना भेटी दिल्या जानोरी येथे त्यांनी गावातील जिल्हा परिषद शाळा रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले विद्यालय तसेच गावातील सर्व अंगणवाड्या यांना भेटी दिल्या त्यानंतर त्यांनी गावातील घनकचरा व्यवस्थापन वैयिक्तक व सार्वजनिक शौचालय गावातली स्मशानभूमी बाजार तळ विविध प्रभागातील वाड्या-वस्त्यांना भेट देऊन तेथील सार्वजनिक स्वच्छतेची माहिती घेतली गावातील शासकीय इमारतींना भेटी देऊन त्यातील कामकाज बघितले या सर्व कामाची पाहणी केल्यानंतर त्यांनी गावाच्या विविध उपक्र माबद्दल समाधान व्यक्त केले असून भविष्यात जानोरी गाव हे देशात आदर्श ठरेल अशा शुभेच्छा गावातील ग्रामस्थांना दिल्या या समतिीत असलेले अनिल नागणे पेठ तालुक्याचे गटविकास अधिकारी कवळे विस्ताराधिकारी खांदवे स्वच्छता अभियान प्रमुख सहारे पेट विस्ताराधिकारी पाटील आदि या समतिीमध्ये समाविष्ट होते या कमिटीचे स्वागत जानोरी गावच्या सरपंच संगीता सरनाईक उपसरपंच विष्णुपंत काठे यांनी केले यावेळी ग्रामपंचायत सदस्य शंकरराव वाघ गणेश तिडके अशोक केंग सुभाष नेहरे मा प स सदस्य सुनील घुमरे ग्रामपंचायत ग्राम विकास अधिकारी जगताप तलाठी कुलकर्णी ग्रामपंचायत कर्मचारी संजय बोस निलेश विधाते प्रवीण चौधरी सुनील बो स समाधान बेंडकोळी श्यामराव खांबेकर राजू खेराले विक्र म विधाते यांच्यासह गावातील ग्रामस्थ उपस्थित होते