माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणकरांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 27, 2019 05:52 PM2019-01-27T17:52:45+5:302019-01-27T17:53:02+5:30
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणा जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट देण्यात आली.
सिन्नर : तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायतीस बुलढाणा जिल्हा परिषद पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांची अभ्यास दौऱ्यानिमित्त भेट देण्यात आली.
समितीमध्ये जिल्हा परिषद सदस्य आशिष रहाटे, पंचायत समिती सदस्य निंबाजी पांडव, राजीव गणवट, सहाय्यक गटविकास अधिकारी सबीना शेख, एस. के. जाधव आदी उपस्थित होते. ग्रामपंचयतीची सुसज्ज इमारत, सीसी टीव्ही, कचरा व्यवस्थापन, ई-लर्निंग प्रणाली, मिनरल वॉटर प्रोजेक्ट, वायफाय, वाचनालय, व्यायामशाळा, सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशिन, विधवा अपंग परितक्त्या महिलांच्या मुलींना लॅपटॉप वाटप, सुकन्या योजना, पाण्याचे एटीएम मशिन, सोलर ग्रीड टाय सिस्टीम, पिठाची गिरणी, दररोजचा जमा खर्च, पाण्याचे जार व डस्टबीन वाटप आदींसह अनेक उपक्रमांची पाहणी करून पदाधिकाºयांनी कौतुक केले. सरपंच संगिता सांगळे यांनी ग्रामपंचायतीच्या उपक्रमाची माहिती दिली. यावेळी उपसरपंच जयश्री जाधव, सदस्य वामन गाडे, अनिल आव्हाड, खंडु सांगळे, अशोक जाधव, मालती आव्हाड, महेंद्र सांगळे, अमोलिक जाधव, खंडु जाधव, शैला पवार, विलास सांगळे, सूर्यभान सांगळे, कचरु जाधव, मंगेश सांगळे, माजी सरपंच तुकाराम सांगळे, ग्रामविकास अधिकारी कैलास वाघचौरे, ग्रामपंचायत कर्मचारी सतीश घुगे, विलास आवारे, दतु घूगे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.