वस्तीवरची पोरं विमानाने शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2019 08:10 PM2019-03-07T20:10:36+5:302019-03-07T20:13:04+5:30

खर्डे : शिक्षकांच्या पुढाकाराने आदिवासी वस्तीवरील विद्यार्थी चक्क विमानाने राज्याच्य शिक्षण मंत्र्यांच्या गेटीला गेले.

 Visit to the Minister of Education in the city | वस्तीवरची पोरं विमानाने शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला

वस्तीवरची पोरं विमानाने शिक्षणमंत्र्यांच्या भेटीला

Next
ठळक मुद्देशिक्षकांनी पुढाकार घेतला

खर्डे : शिक्षकांच्या पुढाकाराने आदिवासी वस्तीवरील विद्यार्थी चक्क विमानाने राज्याच्य शिक्षण मंत्र्यांच्या गेटीला गेले.
जिल्हा परिषद शाळांचे रूपडे आणि शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी वाड्या, वस्त्यां, तांड्या, पाड्यांवरील शाळेतील शिक्षक पोटतिडकीने झटत आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी व विद्यार्थ्यांना नवनवे धडे मिळविण्यासाठी शिक्षक प्रयत्न करीत आहेत. असाच अनोखा प्रयोग देवळा तालुक्यातील खामखेडा येथील फांगदर या आदिवासी वस्तीवरील जिल्हा परिषदेच्या वस्तीशाळेत झाला.
शिक्षकांनी पुढाकार घेतला आणि ह्या वस्तीवरील २४ मुले विमानाने मुंबईला सहलीला निघालेत. शिक्षक संजय गुंजाळ, खंडु मोरे व आनंदा पवार यांनी विमानाने मुंबईला सहल काढायचा प्रस्ताव पालक आणि शिक्षण समितीसमोर ठेवला. आपल्याला विमान देखील पहायला मिळाले नाही. आपल्या मुलांना विमानात बसायला मिळत आहे म्हणुन पालकांनी आपापल्या क्षमतेनूसार पैसे दिले. गुरु वारी (ता.७) नाशिक येथून चोवीस विद्यार्थी विमानाने मुंबईला रवाना झाले.
मुंबईत विधानभवन, मंत्रालय, मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री भेट, नेहरू तारांगण, सी-लिंक व मुंबई दर्शन करणार आहेत. दरम्यान शिक्षणाविषयी ओढ असल्याने या विभागाच्या सचिव डॉ. वंदना कृष्णा यांना देखील विद्यार्थी भेटणार आहेत.

चोवीस विद्यार्ध्यांपैकी नऊ विद्यार्थ्यांचे पालक रोजंदारीने कामाला जाणारे शेतमजुर आहेत. इतर सर्व शेतकऱ्यांची मुल आहेत. मात्र, शिक्षकांचा पुढाकार आणि त्यांच्या शैक्षणिक उपक्र मांमुळे शिक्षणप्रेमीं पालकांनी या सहलीला मदत केली. त्यामुळेच या आदीवासी वस्तीवरच्या विद्यार्थ्यांना जग पहायला संधक्ष मिळाली.

शिक्षणाधिकारी विमानतळावर....
जिल्ह्यातली उपक्र मशील शाळा व विद्यार्थ्यांच्या आगळ्या-वेगळ्या उपक्र माचे कौतुक म्हणुन विद्यार्थ्यांना जि.प.सदस्य धनश्री आहेर, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली झनकर, गटशिक्षणाधिकारी सुनिता धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी प्रमोद चिंचोले, माजी सरपंच गोकुळ मोरे, प्रभाकर बच्छाव, साहेबराव मोरे, नाना वाघ, नाना पवार, मिलिंद मोरे यांनी विध्यार्थ्यांना ओझर विमानतळावर भेटण्यासाठी हजेरी लावली.

(फोटो ०७ विमान, ०७ विमान १)
विमानाने प्रवास करणारी फांगदर, खामखेडा ता. देवळा शाळेची मुले.

Web Title:  Visit to the Minister of Education in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.