बालदिनानिमित्त संग्रहालयास भेट

By admin | Published: November 15, 2016 02:12 AM2016-11-15T02:12:33+5:302016-11-15T02:11:16+5:30

तोफखाना : संवर्धन बहुद्देशीय संस्थेचा उपक्रम

Visit to the Museum for Children's Day | बालदिनानिमित्त संग्रहालयास भेट

बालदिनानिमित्त संग्रहालयास भेट

Next

नाशिकरोड : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त संवर्धन बहुद्देशीय संस्थेच्या वतीने ४५० विद्यार्थ्यांना आर्टिलरी सेंटरमध्ये मोफत तोफखाना वस्तुसंग्रहालय दाखविण्यात आले.
पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती बालदिन म्हणून साजरी करण्यात येते. या बालदिनाचे औचित्य साधून सिन्नरफाटा येथील संवर्धन बहुद्देशीय संस्थेने सिन्नरफाटा, चेहेडी, गोरेवाडी, सामनगाव, चाडेगाव, अरिंगळे मळा आदि परिसरातील सुमारे ४५० विद्यार्थ्यांना शनिवारी सकाळी विनामूल्य तोफखाना वस्तुसंग्रहालय दाखविण्यास नेले होते. सिन्नरफाटा हनुमान मंदिर येथून डॉ. एल.एस. तांबोळी, तुषार म्हस्के, बौद्धाचार्य नंदू जाधव, अशोक खालकर, मधुकर नितनवरे, अमरसिंह पाटील, अविनाश वाघ, वसंत अरिंगळे आदिंच्या हस्ते हवेत फुगे सोडण्यात आले.
संवर्धन संस्थेचे अध्यक्ष सचिन चव्हाण यांनी लष्करी अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी धनंजय करके, अ‍ॅड. अपर्णा पाटील, प्रा. राम खैरनार, पराग वाघ, राजेंद्र पवार, भावना शिंदे, जितेंद्र वराडे, संतोष खेडकर, गणेश गायकवाड, नितीन साठे, यावेळी संतोष घोडके, कृष्णकांत वाघ, सचिन निकाळजे, कुलजीतसिंग शिकलकर, जयसिंग चव्हाण, सुनील लव्हाटे, महेश राणे, विनोद गायकवाड, अविनाश कांबळे, बंटी काळे, विनायक भारती, सुनील देवरे आदि उपस्थित
होते. (प्रतिनिधी)

Web Title: Visit to the Museum for Children's Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.