पशु-प्राण्यासाठी पाण्याच्या कुंड्या दाण्याचे घरटे भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 06:35 PM2019-05-25T18:35:10+5:302019-05-25T18:35:29+5:30
निफाड : येथील श्री शनैश्वर देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने श्री शनैश्वर जयंती निफाड येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी केली जाते. याहीवर्षी शनी जयंती २ ते ५ जून या दरम्यान साजरी केली जाणार आहे. मात्र या वर्षी जयंती साजरी करतांना भीषण दुष्काळाने होरपळणाऱ्या पशु-प्राण्यांसाठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. व पाण्याच्या कुंड्या, पक्षासाठी धान्य घरटे, भेट देण्याच्या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.
निफाड : येथील श्री शनैश्वर देवस्थान व ग्रामस्थांच्या वतीने श्री शनैश्वर जयंती निफाड येथे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी केली जाते. याहीवर्षी शनी जयंती २ ते ५ जून या दरम्यान साजरी केली जाणार आहे. मात्र या वर्षी जयंती साजरी करतांना भीषण दुष्काळाने होरपळणाऱ्या पशु-प्राण्यांसाठी मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करण्यात आला. व पाण्याच्या कुंड्या, पक्षासाठी धान्य घरटे, भेट देण्याच्या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला.
शनिवारी (दि.२५) येथील शनी चौकात या उपक्र माचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी व्यासपीठावर वि. दा. व्यवहारे, येवला वन विभागाचे वन परिक्षेत्राधिकारी संजय भंडारी, विंचूरचे वनरक्षक विजय टेकणर, बोकडदरे येथील भारत माता आश्रमाचे स्वामी जनेश्वरजी महाराज, लोणजाई माता मंदिराचे माणिक शास्त्री, पंचायत समिती सदस्य संजय शेवाळे, निफाडचे नगराध्यक्ष एकनाथ तळवाडे, नगरसेवक राजा शेलार, अनिल कुंदे, मुकुंद होळकर, आनंद बिवलकर, दिलीप कापसे, देवदत्त कापसे, जावेद शेख, सेनेचे शहरप्रमुख संजय कुंदे, प्रवीण कराड, संपत व्यवहारे, शिवाजी ढेपले, जया भटेवरा आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्र मात येवला तालुक्यातील राजापूर वन विभागातील, काळवीट व मोर यांच्यासाठी आण िनिफाड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणजाई मातागड येथे पशु प्राण्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी पाण्याच्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या आण िपक्षासाठी धान्याचे व पाण्याचे घरटे भेट देण्यात आले राजापूर वन विभागासाठी २० पाण्याच्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या तर श्री क्षेत्र लोणजाई मातागड परिसरासाठी १ व निफाड शहरासाठी १ पाण्याच्या सिमेंटच्या मोठ्या कुंड्या भेट देण्यात आल्या.
त्याचप्रमाणे निफाड तालुक्यातील श्री क्षेत्र लोणजाई मातागड येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेल्या झाडांसाठी एका पाण्याच्या टँकरचा खर्च देण्यात आला. येवला वन विभागाचे वन परिक्षेत्रिधकारी संजय भंडारी यांनी या पाण्याच्या कुंड्या व घरटे स्वीकारले तर लोणजाई माता मंदिराचे माणकि शास्त्री यांनी पाण्याची कुंडी व घरटे स्वीकारली तर श्री क्षेत्र लोणजाई मातागड येथे मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलेल्या झाडांसाठी एका पाण्याच्या टँकरचा खर्चाचा धनादेश एकनाथ तळवाडे व सुभाष कर्डीले व यांच्या हस्ते माणकि शास्त्री व संजय शेवाळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
या कार्यक्र माचे प्रास्तविक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते वि .दा. व्यवहारे यांनी केले प्रास्तविक करतांना व्यवहारे म्हणाले की श्री शनेश्वर देवस्थानच्या वतीने दरवर्षी अनेक सामाजिक उपक्र म राबविण्यात येतात त्याची माहिती देऊन या वर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने हा उपक्र म राबविण्यात आल्याचे सांगितले शनी जयंती साजरी करतांना दुष्काळाचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकणार्या पशुप्राण्यासाठी मदत करण्याचा निर्णय श्री शनैश्वर देवस्थान व निफाड ग्रामस्थ यांनी घेऊन एक सामाजिक कार्य केले आहे असे ते म्हणाले.
संजय भंडारी आपल्या भाषणात म्हणाले की राजापूर वन विभागाच्या अंतर्गत ५५०० हेक्टर क्षेत्र येते मागे या क्षेत्रात १५०० ते १६०० काळवीट होते. मात्र या वन विभागात वनविभागाच्या वतीने २३ वन तळे करण्यात आले आहे. वन विभाग व विविध सामाजिक संस्था यांनी पाण्याच्या कुंड्याची सोय केल्याने आणि वन विभागाने २३ वन तळे ,पाणवठे उभारल्याने काळविटांची संख्या वाढून ती आता २५०० ते ३००० झाली आहे. चांगल्या कामाला समाजाची साथ मिळत असल्याने राजापूर वन क्षेत्रात उन्हाळ्यात पिण्याचे पाणी पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत असल्याने पाण्यासाठी वणवण भटकताना वन्य प्राण्यांचे रस्त्यावर होणारे अपघात कमी झाले आहे. पाण्याच्या केल्या गेलेल्या सोयीमुळे या वन परिसरात वन्य प्राण्यांना सुरिक्षत वाटू लागले आहे. असे ते म्हणाले.
याप्रसंगी स्वामी जनेश्वर महाराज, संजय शेवाळे , अनिल कुंदे, शिवाजी ढेपले आदी मान्यवरांची भाषणे झाली याप्रसंगी रमेश कापसे, दत्ता उगावकार, संपत धारराव, केशर रु णवाळ, रामदास व्यवहारे, सुभाष कर्डीले, रघुनाथ कुंदे, मधुकर कुंदे, सुधाकर कापसे, कैलास कुंदे, विजय बोरा, किरण बागमार, दिनेश बागमार, अभय सुराणा, राजेंद्र दायमा ,संजय धारराव आदींसह नागरिक उपस्थित होते. आभार एकनाथ तळवाडे यांनी मानले.