पांगरी खुर्दच्या विद्यार्थ्यांची गो-शाळेला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 06:00 PM2019-12-26T18:00:44+5:302019-12-26T18:01:12+5:30
पांगरी : सिन्नर तालुक्यातील पांगरी खुर्द येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदराबाई पांगारकर गो-शाळेस भेट दिली. दप्तरमुक्त शनिवार अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात आल्याची माहिती मुख्याध्यापक रविता भोईर यांनी दिली.
संस्थेचे संचालक मयूर पांगारकर, दीपक पांगारकर व कुटुंबीयांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यानंतर सर्वांना येथील म्हशी व गार्इंचा गोठा व घोड्याचा पागा यांची प्रत्यक्ष माहिती दिली. याप्रसंगी केंद्रप्रमुख कुसुम निकुंभ, पालक नवनाथ दळवी, खंडू शिंदे, कैलास गोपाळे, रमेश पांगारकर, बाळकृष्ण पांगारकर, रमेश बिडवई, हिरामण शिंदे उपस्थित होते. गोशाळेत एकूण एकशे पन्नासच्या आसपास गोधन असून विद्यार्थ्यांना गिर, डांगी, कृष्णा, खेरीगड, गावठी, खिल्लार, राठी, सिंधी, आऊंगोल यासारखे गायींचे प्रकार, मुºहा, जाफराबादी, नागपुरी, पंढरपुरी यासारखे म्हशींचे प्रकार, गावठी घोडे (खेचर) प्रत्यक्षात बघायला मिळाले. पांगरी व परिसरात किंबहुना पश्चिम महाराष्ट्रात दुग्ध क्रांती मोठ्या प्रमाणावर झालेली असली तरी आधुनिक पिढीला जर्सी गाय व म्हैस हे प्रकार वगळता गायी व म्हशींच्या इतर वानांची माहिती नाही. या गो-शाळेत येऊन विद्यार्थ्यांच्या ज्ञानात निश्चितपणे भर पडेल असे निकुंभ म्हणाल्या.