दिल्ली रेल्वे बोर्ड सदस्यांची कर्षणला भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:39 AM2018-01-23T00:39:52+5:302018-01-23T00:40:33+5:30
दिल्ली रेल्वे बोर्डाचे सदस्य घनश्याम सिंग यांनी शुक्रवारी एकलहरारोड येथील कर्षण मशीन कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामगार संघटनांनी रेल्वेची चाके करण्याचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
नाशिकरोड : दिल्ली रेल्वे बोर्डाचे सदस्य घनश्याम सिंग यांनी शुक्रवारी एकलहरारोड येथील कर्षण मशीन कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कामगार संघटनांनी रेल्वेची चाके करण्याचा प्रकल्प सुरू करावा, अशी मागणी सिंग यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
रेल्वे बोर्डाचे सदस्य घनशाम सिंग शुक्रवारी सकाळी कर्षण मशीन कारखान्यास भेट देण्यास आले असता त्यांचा खासदार हेमंत गोडसे, मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत अभियंता आर. पी. शर्मा, उपमुख्य कारखाना प्रबंधक अ़निलकुमार अग्रवाल, इरिनचे संचालक प्रदीप जैन, सीईएलईचे एम. जी. धामणकर, भुसावळचे डीआरएम आर. के. यादव आदिंनी स्वागत केले. यावेळी सिंग यांनी कारखान्याची पाहणी करून कामकाजाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी खासदार हेमंत गोडसे यांनी सिंग यांच्याकडे रेल्वेच्या चाकांचा प्रकल्प सुरू करण्याबाबत चर्चा केली. यावेळी सिंग यांना नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, आॅल इंडिया एससी एसटी संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. गेल्या दहा वर्षांपासून उत्पन्नावर आधारित असलेला बोनस पुन्हा सुरू करावा, रिक्त पदे भरण्यात यावी, निवृत्त होणाºया कर्मचाºयांची पदे भरावीत, कच्चा माल वेळेत उपलब्ध करून द्यावा तसेच येथील दीडशे एकर जागेत प्रकल्प सुरू करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी भारत पाटील, एस. के. शेलार, पी. एम. जाधव, व्ही. के. चौधरी, अनिल दराडे, मनोज नागरे, संदीप नागरे, नाना धोंगडे, योगेश शेळके, राजेश दुसाणे, सुरेशकुमार नायर, सुभाष सोनवणे, किरण खैरनार, मिलिंद देहाडे, जे. पी. येळवे, जे. एस. पवारे, समीर साळवे, प्रमोद बाविस्कर, अनिल जगताप, सुचित्रा गांगुर्डे, ए. पी. गायकवाड, नीलेश रोकडे, रमेश गवई, दीपक धीवर आदी उपस्थित होते.