राजदेरवाडीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 05:05 PM2018-08-27T17:05:22+5:302018-08-27T17:06:24+5:30
चांदवड : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१७-१८ विभागीय समितीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चांदवड तालुक्यातील राजदेरवाडीला भेट देऊन तपासणी केली. यावेळी समितीप्रमुख उपायुक्त (विकास) प्रतिभा संगमनेरे, विभागीय माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे, विभागीय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता नितीन तगलपल्लीवर, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशधीन शळकंदे, दिंडोरी गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, विभागीय पाणी व गुणवत्ता सल्लागार दिनेश मोवळे, जिल्हा समन्वयक पाणी व स्वच्छता संदीप जाधव आदींचा समावेश होता.
चांदवड : संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन २०१७-१८ विभागीय समितीने आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चांदवड तालुक्यातील राजदेरवाडीला भेट देऊन तपासणी केली. यावेळी समितीप्रमुख उपायुक्त (विकास) प्रतिभा संगमनेरे, विभागीय माहिती व जनसंपर्क अधिकारी डॉ. किरण मोघे, विभागीय महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे उपअभियंता नितीन तगलपल्लीवर, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशधीन शळकंदे, दिंडोरी गटविकास अधिकारी भूपेंद्र बेडसे, विभागीय पाणी व गुणवत्ता सल्लागार दिनेश मोवळे, जिल्हा समन्वयक पाणी व स्वच्छता संदीप जाधव आदींचा समावेश होता. यावेळी त्यांनी गाव व परिसरातील स्वच्छता, वैयक्तिक स्वच्छता, शाळा, अंगणवाडी, घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी व्यवस्थापन व पाणीपुरवठा आदी बाबींची पाहणी केली. समितीचे ग्रामपंचायतीतर्फे उपसरपंच मनोज शिंदे, ग्रामसेवक भागवत सोनवणे व सदस्यांनी स्वागत केले. गावातील कामांची व्हिडीओद्वारे माहिती दिली. यावेळी चांदवडचे गटविकास अधिकारी हिरामण मानकर, सहायक गटविकास अधिकारी सुनील पाटील, विस्तार अधिकारी ज्ञानेश्वर सपकाळे, पंचायत समिती सदस्य निर्मला अहेर, गटशिक्षणाधिकारी बी. टी. चव्हाण, बालप्रकल्प विकास अधिकारी गजानन शिंदे, तालुका आरोग्य अधिकारी नितीन ठाकरे, सरपंच सखूबाई माळी, कैलास शिंदे, नंदराज जाधव, दीपक जाधव, जगन यशवंते, जगन जाधव, नानाजी जाधव, जगन्नाथ शिंदे, सुरेश जाधव, विक्रम जाधव, बापू अहेर, तानाजी हरी, तानाजी जाधव, केदू जाधव, वसंत जाधव, निवृत्ती जाधव, भाऊसाहेब शिंदे, राजेंद्र शिंदे, साहेबराव शिंदे, रामदास जाधव, सुधाकर कापडणे, भास्कर कापडणे, बाजीराव जाधव, अशोक शिंदे, संजय जाधव, काळू बोरसे, विस्तार अधिकारी निकम श्रावण शिंदे, उत्तम शिंदे, काळू पवार आदी मान्यवर उपस्थित होते.