देवगाव लसीकरण केंद्रास उपविभागीय अधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:05+5:302021-05-27T04:15:05+5:30
पेठ तालुक्यात कोरोना निर्बंधामुळे दळणवळणाची साधने बंद झाल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी येण्यास अडचणी निर्माण ...
पेठ तालुक्यात कोरोना निर्बंधामुळे दळणवळणाची साधने बंद झाल्याने नागरिकांना प्राथमिक आरोग्य केंद्रावर लस घेण्यासाठी येण्यास अडचणी निर्माण होत असल्याने आरोग्य विभागाकडून गावस्तरावर लसीकरण केंद्र सुरू केले. देवगाव, निरगुडे व कायरे येथे चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे या वेळी दिसून आले. याप्रसंगी तहसीलदार संदीप भोसले, जिल्हा परिषद सदस्य भास्कर गावीत, सभापती विलास अलबाड, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. योगेश मोरे यांच्यासह आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - २६ पेठ ३
देवगाव येथे लसीकरण केंद्राच्या भेटीप्रसंगी डॉ. संदीप आहेर, संदीप भोसले, भास्कर गावीत, विलास अलबाड, डॉ. योगेश मोरे आदी.
===Photopath===
260521\26nsk_23_26052021_13.jpg
===Caption===
देवगाव येथे लसीकरण केंद्राच्या भेटीप्रसंगी डॉ. संदिप आहेर, संदिप भोसले, भास्कर गावीत, विलास अलबाड, डॉ. योगेश मोरे आदी.