वस्त्रोद्योग संचालकांची मालेगावी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 08:45 PM2018-08-08T20:45:48+5:302018-08-08T20:52:49+5:30

 केंद्र शासनाच्या मेगा पॉवरलूम क्लस्टर योजनेच्या अंमलबजावणीसाठी जागेची व येथील वस्त्रोद्योगाची पाहणी करण्यासाठी नागपूर येथील वस्त्रोद्योग विभागाच्या संचालक माधवी खोडे यांनी मालेगावी भेट देऊन येथील विणकरांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या.

 The visit of the textile director to the Malegaon | वस्त्रोद्योग संचालकांची मालेगावी भेट

वस्त्रोद्योग संचालकांची मालेगावी भेट

Next

मालेगाव शहर परिसरात मोठ्या प्रमाणात यंत्रमाग व्यवसाय आहे. वस्त्रोद्योगाचे माहेरघर आहे. या व्यवसायाला उभारी देण्यासाठी व विणकरांच्या भल्यासाठी केंद्र शासनाने मेगा पॉवरलूम क्लस्टर योजना सुरू केली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शहरालगतच्या सायने औद्योगिक वसाहतीला व शेती महामंडळाच्या जमिनीवर असलेल्या औद्योगिक वसाहतीच्या जमिनीची खोडे यांनी पाहणी केली तसेच सायने परिसरातील काही पॉवरलूम क्लस्टरला भेट देवून पाहणी केली. येथील शासकीय विश्रामगृहावर क्लस्टरधारकांकडून व स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यावेळी मुंबईचे वस्त्रोद्योग प्रादेशिक उपसंचालक एस. एम. तांबे, वस्त्रनिर्माण निरीक्षक जी. यु. पाथरे, सहाय्यक संचालक विजय रणपिसे, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, प्रांत अधिकारी अजय मोरे, मनपा आयुक्त संगीता धायगुडे, सहाय्यक उपायुक्त राजू खैरनार, तहसीलदार ज्योती देवरे आदि उपस्थित होते.

Web Title:  The visit of the textile director to the Malegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक