कळवणला आदिवासी क्षेत्र आढावा समितीची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:12 AM2021-06-25T04:12:37+5:302021-06-25T04:12:37+5:30
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेल्या प्रादुर्भाव काळात उपजिल्हा रुग्णालयात आमदार नितीन पवार यांनी साधनसामग्री उपलब्ध करून देत सहकार्य केल्याची बाब ...
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढलेल्या प्रादुर्भाव काळात उपजिल्हा रुग्णालयात आमदार नितीन पवार यांनी साधनसामग्री उपलब्ध करून देत सहकार्य केल्याची बाब आरोग्य यंत्रणेने यावेळी समितीच्या निदर्शनास आणून दिली. उपजिल्हा रुग्णालयात कोविड सेंटर, ऑक्सिजन जनरेशन प्लांटची मंजुरी आदी कामात विशेष लक्ष घातल्याने पंडित यांनी पवार यांचे कौतुक केले. पंडित, वरिष्ठ संशोधन अधिकारी गोपाळ भारती यांनी प्रांत कार्यालयात आढावा बैठक घेऊन कळवण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयांतर्गत राबविण्यात येणाऱ्या आदिवासी विकास विभागाच्या विविध योजना, कामे, आश्रमशाळा, वसतिगृह, निधीसंदर्भात आढावा घेतला.
उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर, नॉनकोविड विभागाची पाहणी करून रुग्णांची विचारपूस करीत आरोग्य सुविधा मिळतात की नाही याची पंडित यांनी खातरजमा केली. वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांशी संवाद साधून अडीअडचणी जाणून घेतल्या. कळवणसारख्या आदिवासी भागात सर्वसुविधांयुक्त आरोग्य यंत्रणेची उपजिल्हा रुग्णालयात उभी केली. त्यामुळे आदिवासी भागातील गोरगरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा मिळत आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय यंत्रणा सक्षम असल्यामुळे रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालय जनतेसाठी आधारवड ठरले असल्याचे सांगून वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनंत पवार व यंत्रणेच्या कामकाजाचे कौतुक केले.
यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना, तालुका वैद्यकीय अधिकारी सुधीर पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अनंत पवार यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - २४ कळवण १
कळवण उपजिल्हा रुग्णालयाची पाहणी करताना आढावा समितीचे अध्यक्ष विवेक पंडित, डॉ. अनंत पवार आदी.