कवडदरा परिसरात बिबट्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:40 PM2020-02-18T12:40:45+5:302020-02-18T12:40:53+5:30

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा परीसरातील कडवा वसाहत येथील रोंगटे वस्ती परिसरात चार बिबटे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

 Visiting Bibetan in Kawadara area | कवडदरा परिसरात बिबट्यांचे दर्शन

कवडदरा परिसरात बिबट्यांचे दर्शन

Next

कवडदरा : इगतपुरी तालुक्यातील कवडदरा परीसरातील कडवा वसाहत येथील रोंगटे वस्ती परिसरात चार बिबटे आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. बिबटे सतत दोन तीन दिवसापासुन या कवडदरा येथील ग्रमापंचायत सदस्य भोरु रोंगटे यांच्या वस्तीवर येत असल्याने कुंटुंबातील सर्व सदस्यासह लहान मुले देखील भयभीत झाले आहेत. परिसरातील नागरिक तसेच सकाळच्या सञात शाळेत जाणारे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी वनविभागाने गांभीर्याने लक्ष देवून या ठिकाणी पिंजरा लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
मागील काही दिवसांपूर्वी याच बिबटयांनी इगतपुरी तालुक्याच्या पूर्व भागात नांदूरवैद्य, साकुर, नांदगाव बुद्रुक, अस्वली, बेलगाव कुर्हे, कुर्हेगाव, गोंदे दुमाला, घोटी खुर्द,वाडी,पिंपळगाव डुकरा,पिंपळगाव घाडगा,येथील नागरी वस्तीत दहशत वाढविली आहे. घोटी खु.शिवारातील मारुती रोंगटे यांची दिवसा शेळ्या चारत असताना शेळी फस्त केली होती. अशा अनेक घटना परिसरात घडल्या असून परिसरातील नागरिक दिवसा कामासाठी बाहेर निघण्यास घाबरत आहेत. वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे.
---------------------------------------------------------------
गेल्या अनेक दिवसापांसून माझ्या घराजवळ तीन चार बिबट्यांचे वास्तव्य असल्याचा माझा अंदाज आहे. खुपच भितीचे वातावरण परिसरात पसरलेले आहे. दररोज सायंकाळी सहासाडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याचे दर्शन होत आहे. वनविभागाने लवकरात लवकर पिंजरा लावावा.
-भोरु रोंगटे, ग्रामपंचायत सदस्य

Web Title:  Visiting Bibetan in Kawadara area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक