पुस्तके भेट देऊन ‘त्यांचा’ झाला गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2018 12:20 AM2018-10-30T00:20:50+5:302018-10-30T00:21:34+5:30

विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या सामन्यज्ञानात भर पडावी या उद्योशाने नाशिकरोड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चांडक-बिटको महाविद्यालयात वाचन उपक्रम राबविण्यात आला.

 By visiting the books 'His' will be the glory of 'His' | पुस्तके भेट देऊन ‘त्यांचा’ झाला गौरव

पुस्तके भेट देऊन ‘त्यांचा’ झाला गौरव

Next

नाशिक : विद्यार्थ्यांमध्ये अवांतर वाचनाची गोडी निर्माण होऊन त्यांच्या सामन्यज्ञानात भर पडावी या उद्योशाने नाशिकरोड येथील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या चांडक-बिटको महाविद्यालयात वाचन उपक्रम राबविण्यात आला. महाविद्यालयातील मराठी विभागातील १७ विद्यार्थिनींनी स्वत: वाचलेल्या १७ थोर नेत्यांच्या पुस्तकांचा परिचय करून दिला. त्यांनी केलेले प्रभावी सादरीकरण व वाचनाची आवड जोपासल्याबद्दल त्यांचा १७ पुस्तके भेट देऊन गौरव करण्यात आला.  यावेळी पूजा दंडगव्हाळ (भारताचे सुपुत्र यशवंतराव चव्हाण), प्रियंका तायडे (सत्याचा जलसा), धनश्री कुलकर्णी (चाफेकर पर्व), दीपाली शिंदे (सावित्रीबाई फुले), निरंजना बिडकर (संत गाडगेबाबा), गौतमी पगारे (बलूतं), सोमनाथ आहिर (लोकमान्य टिळक), संतोष टोचे (अग्निपंख), दीपक जाधव (डॉ. आंबेडकर), पंढरीनाथ गवळी (कर्मवीर भाऊराव पाटील, उज्ज्वला रंधे (स्वातंत्र्यवीर सावरकर), शीतल कंक (प्रकाश आमटे), तेजस्विनी सहाणे (सावित्रीआई फुले), मोना बागुल (पाचोळा), प्रियंका कटारे (मुक्ती कोन पथे), छाया काळे (यशोगाथा) यांनी स्वत: वाचलेल्या पुस्तकाविषयीचे अनुभव थोडक्यात सादर केले. यावेळी सुरुवातीला महाविद्यालयाच्या वतीने डॉ. उत्तम करमाळकर यांनी डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनपटाची चित्रफित सादर केली. प्रा. आर. टी. अहेर यांनी उत्कृष्ट पुस्तक वाचन करणाऱ्या १७ विद्यार्थिनींना पुस्तके भेट देण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा. अनंत येवलेकर, प्राचार्य डॉ. धनेश कलाल, उपप्राचार्य डॉ. एस. एन. तुपे, उपप्राचार्य डॉ. दिलीप बेलगावकर आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य कलाल म्हणाले की, विद्यार्थ्यांनी व्यक्तिमत्व विकासासाठी वाचनाचा छंद जोपासणे आवश्यक आहे. यामुळे भावी काळात आपणाला यशस्वी होण्याचा मार्ग सापडतो. कार्यक्रमास शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title:  By visiting the books 'His' will be the glory of 'His'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.